Babar vs Virat Kohli : पाकिस्तानातील चॅम्पियन्स वन डे चषक स्पर्धेत झळकली विराट कोहलीची जर्सी

71
Babar vs Virat Kohli : पाकिस्तानातील चॅम्पियन्स वन डे चषक स्पर्धेत झळकली विराट कोहलीची जर्सी
Babar vs Virat Kohli : पाकिस्तानातील चॅम्पियन्स वन डे चषक स्पर्धेत झळकली विराट कोहलीची जर्सी

ऋजुता लुकतुके 

बाबर आझम विरुद्ध विराट कोहली असा एक सुप्त ट्रेंड आता सोशल मीडियावर वाढू लागला आहे. पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमधील चॅम्पियन्स एकदिवसीय करंडक स्पर्धेत तसं चित्र दिसलं. अलीकडेच माजी पाक कर्णधार युनिस खानने बाबर आझमने विराटकडून काहीतरी शिकावं, असा शेरा मारला होता. त्यानंतर याविषयी उघडपणे सोशल मीडियावर बोललं जाऊ लागलं आहे. आता पाकिस्तानमधील एका सामन्यात बाबर आझम खेळत असताना प्रेक्षकांनी विराट कोहलीची जर्सी उंचावली. स्टॅलियन्स विरुद्ध मारखोर अशा या सामन्यात बाबर स्टॅलियन्स संघाचं प्रतिनिधित्व करत होता. (Babar vs Virat Kohli)

विराटची पाकिस्तानमधील लोकप्रियता तर या कृतीमुळे दिसलीच. शिवाय दोघांची होत असलेली तुलना हे कारणही त्यामागे होतं. लगेच हा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/toxifyxe/status/1835299714092114052

विराट कोहली सध्या भारतीय संघाबरोबर आगामी कसोटी हंगामासाठी सराव करत आहे. टी-२० विश्वचषकानंतर काही महिने आपल्या कुटुंबीयांबरोबर लंडनला घालवल्यानंतर विराट कोहली भारतात परतला आहे. आता तो घरच्या मैदानावरील पाच कसोटी खेळल्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करत आहे.

भारतीय संघाबरोबर विराटने चेन्नईच्या तळपत्या उन्हात कसून सराव चालवला आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात विराट दक्षिण आफ्रिकेत शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर मायदेशातील इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून त्याने घरगुती कारणामुळे माघार घेतली होती. त्याचा मुलगा अकायच्या जन्माच्या वेळी त्याने पत्नीबरोबर राहण्यासाठी रजा घेतली होती. आयपीएल आणि टी-२० विश्वचषकानंतर तो पुन्हा एकदा लंडनला परतला होता. आता तो संघात दाखल झाला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.