Harmanpreet Kaur : टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघ गिरवतोय मानसिक कणखरतेचे धडे 

Harmanpreet Kaur : टी-२० विश्वचषकात भारतीय गटात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचा समावेश आहे 

100
Harmanpreet Kaur : टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघ गिरवतोय मानसिक कणखरतेचे धडे 
Harmanpreet Kaur : टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघ गिरवतोय मानसिक कणखरतेचे धडे 
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या आगामी टी-२० विश्वचषकाची तयारी करत आहे. त्याचवेळी संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने खेळाडूंसाठी मानसिक कणखरतेची आवश्यकता असल्याचं नमूद केलं आहे. इतकंच नाही तर संघ सध्या तेच धडे गिरवत असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा समावेश ए गटात झाला आहे. आणि तिथे ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंड सारख्या संघांचं तगडं आव्हान असेल. २०२० च्या शेवटच्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ उपविजेता ठरला होता. ऑस्ट्रेलियाकडून महिलांना पराभव पत्करावा लागला होता. (Harmanpreet Kaur)

(हेही वाचा- Wrestling Champions Super League : साक्षी व अमन सेहरावतच्या पुढाकाराने भारतात कुस्ती लीगच्या आयोजनाची तयारी )

त्यावर बोलताना हरमनप्रीत म्हणते, ‘मागच्या काही मालिकांमध्ये भारतीय महिला संघ मानसिक कणखरता राखण्यावर भर देत आहे. टी-२० विश्वचषका दरम्यानही भारतासमोर तीच कसोटी असेल. शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक तंदुरुस्तीचं महत्त्व खेळाडूंना पटलं आहे. तीच तयारी सध्या सुरू आहे.’  (Harmanpreet Kaur)

भारतीय महिला संघाच्या बाबतीत अनेकदा असं घडतं की, हातात असलेला सामना किंवा चुरशीच्या क्षणी शेवटच्या ४ ते ५ षटकांत सामना संघाच्या हातातून निसटतो. यापूर्वीच्या दोन टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला आहे. दोन्ही वेळा फरक ८ आणि ७ धावांचा होता. त्यामुळे यंदा ही गोष्ट सुधारण्यावर भारतीय महिला संघ भर देणार आहे. भारताची टी-२० विश्वचषक मोहीम ४ ऑक्टोबरला सुरू होईल. पहिला मुकाबला न्यूझीलंडशी आहे. त्यानंतर लगेचच ६ ऑक्टोबरला भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करायचे आहेत. (Harmanpreet Kaur)

(हेही वाचा- Babar vs Virat Kohli : पाकिस्तानातील चॅम्पियन्स वन डे चषक स्पर्धेत झळकली विराट कोहलीची जर्सी)

९ ऑक्टोबरला भारताचा मुकाबला श्रीलंकेशी होणार आहे. यावर्षी आशिया चषक अंतिम फेरीत भारतीय महिलांचा श्रीलंकन महिलांनी ७ धावांनी पराभव केला होता. त्यानंतर १३ ऑक्टोबरला भारताचा मुकाबला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यंदाचा महिला टी-२० विश्वचषक संयुक्त अरब अमिराती इथं होत आहे. बांगलादेशमधील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे तिथून ही स्पर्धा हलवण्यात आली आहे. शारजा, आबूधाबी आणि दुबई इथं स्पर्धेचे सामने पार पडणार आहेत. (Harmanpreet Kaur)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.