Atishi Marlena : आपच्या नेत्या अतिशी होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री

169
Atishi Marlena : आपच्या नेत्या अतिशी होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री
Atishi Marlena : आपच्या नेत्या अतिशी होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री

देशाची राजधानी दिल्लीची सूत्रे पुन्हा एकदा महिलेच्या हाती आली आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आप नेत्या अतिशी मार्लेना (Atishi Marlena) यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या घरी झालेल्या बैठकीत नव्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीसाठी सर्व आमदारांची बैठक झाली. आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राजीनामा देतील त्यानंतर अतिशी या नव्या मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचा कार्यभार सांभाळतील. संध्याकाळी ४.३० वाजता केजरीवाल उपराज्यपाल विनय सक्सेना यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा सुपूर्द करतील.

त्यानंतर नव्या मुख्यमंत्रीपदासह इतर मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडेल. आमदारांच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला त्यावर सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. सुरुवातीपासून त्यांचे नाव आघाडीवर होते. अतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातून येतात आणि त्यांनी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीतून पदवीचं शिक्षण पूर्ण केले आहे. २०२० साली अतिशी (Atishi Marlena) पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर २०२३ साली त्या केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्या. आता वर्षभरातच त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आली.

अतिशी (Atishi Marlena) या केजरीवाल यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून त्या संघटनेत सक्रीय आहेत. सध्या त्यांच्याकडे सर्वाधिक मंत्रालयांचा कारभार होता. केजरीवाल जेव्हा कारागृहात गेले, तेव्हापासून संघटना ते सरकार सर्व पातळीवर त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.