धर्मांध मुसलमानांच्या विरोधात परखड बोलणाऱ्या Nazia Elahi Khan यांना आल्या धमक्या

३ ऑगस्‍ट २०२४  या दिवशी दिलेल्‍या मुलाखतीनंतर नाझिया खान यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला होता.

132
धर्माध मुसलमानांच्या धर्मांधतेच्या विरोधात परखडपणे बोलणाऱ्या नाझिया इलाही खान (Nazia Elahi Khan) यांना १० सप्‍टेंबर या दिवशी ईश्‍वरनिंदा प्रकरणात अटक करण्‍यात आली होती. त्‍यांच्‍यावर प्रेषित महंमद यांचा अपमान केल्‍याचा आरोप होता. त्‍यांच्‍या विरोधात वकील  नूर मेहविश यांनी तक्रार केली होती. या प्रकरणी अलीपूर न्‍यायालयात उपस्‍थित राहिल्‍यानंतर नाझिया यांना जामीन मिळाला असला, तरी धर्माध मुसलमानांचा त्यांच्याविरोधातील संताप वाढतच आहे. त्यांनी आता नाझिया यांना धमक्या देणे सुरु केले आहे.

३ ऑगस्‍ट २०२४  या दिवशी दिलेल्‍या मुलाखतीनंतर नाझिया खान यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला होता. त्‍यांच्‍या मुलाखतीत त्‍यांनी ‘मुसलमान हिंदु नावाने दुकाने का चालवत आहेत ?’, यावर आक्षेप घेतला होता. हिंदूंना ‘काफिर’ मानणार्‍या सलीम याने महादेवाच्‍या नावाने ढाबा का उघडला, अस प्रश्‍नही त्‍यांनी (Nazia Elahi Khan) उपस्‍थित केला होता.
या मुलाखतीतल नाझिया यांनी मुसलमानांच्‍या धर्मांधतेविषयी काही उदाहरणे दिली, ज्‍यामुळे वाद निर्माण झाला. ‘हिंदूंनी त्‍याच्‍या दुकानाचे इस्‍लामवरून नाव ठेवल्‍यास गदारोळ होईल आणि त्‍यांना ‘सर तनसे जुदा’ची धमकी देण्‍यात येईल’, असे त्‍या म्‍हणाल्‍या होत्‍या. नाझिया यांनी त्‍यांच्‍या एका व्‍हिडिओमध्‍ये ‘थुंक जिहाद’चा धोकाही स्‍पष्‍ट केला होता. त्‍या म्‍हणाल्‍या होत्‍या की, नाव पालटून व्‍यवसाय करण्‍याची काय आवश्‍यकता आहे? ज्‍याच्‍या मनात चोरी असते, तोच हे करतो. या वेळी त्‍यांनी योगी आदित्‍यनाथ यांच्‍या दुकान मालकांनी त्‍यांच्‍या दुकानावर स्‍वतःचे नाव लिहिण्‍याविषयी दिलेल्‍या निर्णयाचे समर्थन केले होते. मात्र आता नाझिया (Nazia Elahi Khan) यांना मुसलमानांच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.