Bangladesh मध्ये हिंदू असुरक्षितच; ऑगस्ट महिन्यात 15 दिवसांत हिंदूंवर हजाराहून अधिक ठिकाणांवर हल्ले

66
बांगलादेशमध्ये (Bangladesh) ऑगस्ट महिन्यात गेल्‍या महिन्‍यात 5 ऑगस्‍टला शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देवून भारतात पळ काढला. यानंतर बांगलादेशातील 64 पैकी किमान 50 जिल्‍ह्यांमध्‍ये असंख्‍य हिंदूंवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे झाली. हिंदूंना लक्ष्य करण्‍यात आले नसल्‍याचे अनेक विदेशी, तसेच साम्‍यवादी प्रसारमाध्‍ये सांगत असतांना आता तेथील ‘प्रथम आलो’ नावाच्‍या प्रसिद्ध बंगाली दैनिकाने यासंदर्भात आकडेवारीच मांडली आहे. केवळ 5 ते 20 ऑगस्‍टच्‍या पंधरवड्यात हिंदूंची मंदिरे, घरे अथवा दुकाने अशा एकूण 1 हजार 68 ठिकाणांना मुसलमानांनी लक्ष्य केले.
या वृत्तामध्‍ये जिल्‍ह्यानिहाय आकडेवारी मांडण्‍यात आली आहे. दैनिकाने सांगितले की, सध्‍या बांगलादेशातील (Bangladesh) अनेक जिल्‍ह्यांमध्‍ये पूरसदृश परिस्‍थिती असली, तरी आम्‍ही सर्व माहिती संपादित करून आमच्‍या वाचकासंमोर मांडत आहोत. आम्‍ही देशभरात घडलेल्‍या प्रत्‍येक घटनेची शहानिशा करूनच ही आकडेवारी मांडली आहे. याआधीपर्यंत आक्रमणांची संख्‍या ही ३०० च्‍या जवळपास असल्‍याचे सांगितले जात होते. आता मात्र ही संख्‍या तिप्‍पटहून अधिक झाल्‍याचे या वृत्तातून समजते. राजशाही, खुलना, बारिसाल, रंगपूर, सिल्‍हेट, मयमेनसिंह, नागांव, चपाईनवाबगंज, पटुआखाली, नोआखाली, पंचगड, बर्गुना, ठाकूरगाव, पिरोजपूर, दिनाजपूर, झेनाईदा, झालाकाठी, कोमिला, निलफामारी, मेहेरपूर, फरीदपूर, चांदपूर, लालमोनिरहाट, चुआडांगा, राजबारी, मौलवीबाजार, गायबांधा, जेसोर, टंगैल, जोयपूरहाट, मागुरा, सातखिडा, किशोरगंज, बोगरा, माणिकगंज, जमालपूर, सिराजगंज, मुंशीगंज, शेरपूर, बागेरहाट, नरसिंगडी आणि नारायणगंज या 42 जिल्‍ह्यांमध्‍ये हिंदूंवर आक्रमणे झाली. (Bangladesh)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.