पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे 21 ते 23 सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असतील. मंत्रालयाने पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे तपशीलवार वेळापत्रक शेअर केले.
(हेही वाचा Bangladesh मध्ये हिंदू असुरक्षितच; ऑगस्ट महिन्यात 15 दिवसांत हिंदूंवर हजाराहून अधिक ठिकाणांवर हल्ले)
मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शनिवार, २१ सप्टेंबर रोजी डेलावेअरमधील विल्मिंग्टन येथे चार नेत्यांची शिखर परिषद होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे त्यांच्या गावी या परिषदेचे आयोजन करणार आहेत. कारण जो बायडेन दुसऱ्यांदा निवडणूक लढवत नाहीत.त्यामुळे पुढील वर्षी भारत जेव्हा चतुर्भुज शिखर परिषद आयोजित करेल, तेव्हा अमेरिकेला नवा राष्ट्राध्यक्ष मिळेल. प्रत्येक क्वाड नेत्यांशी असलेले त्यांचे खोल वैयक्तिक संबंध आणि आपल्या सर्व देशांसाठी क्वाडचे महत्त्व, असे राष्ट्रपतींच्या प्रवक्त्या करीन जीन-पियरे यांनी एएफपीला सांगितले. क्वाड समिटमध्ये जपानचे फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज देखील उपस्थित राहणार आहेत. (PM Narendra Modi)
Join Our WhatsApp Community