Lebanon मध्ये ‘पेजर बॉम्बस्फोट’; 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी

136
लेबनॉनमध्ये (Lebanon)  सीरियल पेजर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 1200 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये आरोग्य कर्मचारी, इराणचे राजदूत मोजितबा अमानी आणि हिजबुल्लाहच्या सैनिकांचा समावेश आहे. दरम्यान, यामध्ये इस्रायलचा हात असल्याचा संशय हिजबुल्लाने व्यक्त केला आहे. या घटनेनंतर लेबनीज सरकारने सर्व लोकांना त्यांच्याकडील पेजर फेकून देण्यास सांगितले आहे.
पेजरशिवाय रेडिओ आणि ट्रान्समीटरचाही स्फोट झाल्याची माहिती आहे. हिजबुल्लाहवरील हा ताजा हल्ला अतिशय धक्कादायक आहे. लेबनॉनमध्ये (Lebanon) ज्याप्रकारे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणला, तो अशा प्रकारचा पहिलाच हल्ला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाचे सैनिक पेजर वापरतात, त्यामुळेच अशा प्रकारचा हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पेजर बॉम्बस्फोट सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटांची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. हिजबुल्ला एजन्सी या स्फोटांचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या हल्ल्यांचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात रक्ताने माखलेले लोक जमिनीवर पडलेले दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याने रुग्णालयांमध्येही गोंधळाचे वातावरण आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.