भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सध्याच्या कार्यकाळात वन नेशन-वन इलेक्शन लागू करेन. ‘या सरकारच्या कार्यकाळातच ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ (One Nation One Election) ही प्रणाली लागू करण्याची आमची योजना आहे. या सरकारच्या कार्यकाळातच वन नेशन-वन इलेक्शन विधेयक आणले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गृहमंत्री Amit Shah यांनी पत्रकार परिषदेला घेतली. या दरम्यान अमित शहा यांनी वन नेशन-वन इलेक्शनवर भाष्य केले.
(हेही वाचा – Sameer Khan Accident : नवाब मलिक यांच्या जावयाच्या गाडीचा गंभीर अपघात)
अमित शाह पुढे म्हणाले की, गेल्या महिन्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’चा जोरदार पुरस्कार केला होता. वारंवार होणाऱ्या निवडणुका देशाच्या प्रगतीला अडथळा ठरत असल्याचे म्हटले होते. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘एक देश, एक निवडणूक’साठी देशाला पुढे यावे लागेल. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ हे भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनाम्यात दिलेल्या प्रमुख आश्वासनांपैकी एक आहे.
जात जनगणनेवर लवकरच निर्णय घेणार
जात जनगणनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, जनगणनेबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. पुढील 15 दिवस पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा साजरा केला जाईल. सेवा पंधरवाडा म्हणजे गरजू लोकांची सेवा करणे. ही पत्रकार परिषद तिसऱ्या कार्यकाळाच्या 100 दिवसांवर आहे. आम्हाला तिसऱ्यांदा जनादेश मिळाला आहे. 10 वर्षे विकासाची दारं कायम ठेवल्यानंतर 11व्या वर्षात पोहोचली आहे. देशाची व्यवस्था प्रत्येक प्रकारे मजबूत झाली आहे. शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल झाला आहे. अनेक देशांना नवीन शैक्षणिक धोरण, मेड इन इंडिया, डिजिटल इंडिया या योजना स्वीकारायच्या आहेत.
वक्फ दुरुस्ती विधेयकाचाही उल्लेख
वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत (Waqf Amendment Bill) अमित शाह (Amit Shah) यांनी भाष्य केले. ते म्हणाले, येत्या काही दिवसांत वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर केले जाईल. 1 जुलैपासून अमलात आलेले तीन नवीन कायदे फौजदारी न्याय व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बळकटी देणार आहेत. दोन वर्षांत संपूर्ण देशात याची अंमलबजावणी केली जाईल. संविधान हत्या दिनानिमित्त देशातील जनतेला जाणीव होईल. पंतप्रधानांच्या रशिया-युक्रेन दौऱ्यावर संपूर्ण जगाचे लक्ष मोदींवर लागून आहे. रेल्वे अपघात हे षडयंत्र असेल, तर ते फार काळ टिकणार नाही. सीबीआय, एनआयए, रेल्वे पोलीस रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेसाठी संयुक्तपणे रणनीती बनवत आहेत. (One Nation One Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community