Rohit Sharma on Gambhir : रोहित शर्माने ‘या’ दोन शब्दांत केलं गौतम गंभीरचं वर्णन

Rohit Sharma on Gambhir : गौतम गंभीर आणि भारतीय संघाचं नवीन नातं तयार होत असल्याचं रोहित म्हणाला

167
Rohit Sharma on Gambhir : रोहित शर्माने ‘या’ दोन शब्दांत केलं गौतम गंभीरचं वर्णन
Rohit Sharma on Gambhir : रोहित शर्माने ‘या’ दोन शब्दांत केलं गौतम गंभीरचं वर्णन
  • ऋजुता लुकतुके 

गौतम गंभीरने भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कारभार हाती घेतल्याला अजून जेमतेम दोन महिने झाले आहेत. एवढ्यात एक टी-२० आणि एक एकदिवसीय मालिका फक्त पार पडलीय. भारतीय संघाला मागची ३ वर्षं राहुल द्रविडची सवय होती. त्यांच्या कार्यकाळात भारताने टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावलं. एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० प्रकारात अव्वल क्रमांक पटकावला. एकदिवसीय विश्वचषकातही उपविजेतेपद मिळवलं. त्यांच्या संयमी मार्गदर्शनाची खेळाडूंना सवय होती. आताचा प्रशिक्षक गौतम गंभीरची शैली नक्कीच वेगळी आणि जास्त आक्रमक आहे. (Rohit Sharma on Gambhir)

(हेही वाचा- India Win Asian Champions Trophy : पाकच्या खेळाडूंनी जेव्हा भारताविरुद्ध चीनचा झेंडा फडकावला…)

अशावेळी भारतीय खेळाडू या बदलाशी कसं जुळवून घेतायत? रोहित शर्माला हाच प्रश्न काही पत्रकारांनी विचारला. ‘त्यांचा दृष्टिकोण वेगळा आहे,’ असं म्हणत रोहीतने हा विषय सकारात्मकपणे संपवला. ‘राहुलभाई, विक्रम राठोड (Vikram Rathore) आणि पारस म्हांब्रे (Paras Mhambrey) यांचा चमू वेगळा होता. आताचा वेगळा आहे. त्यांची जागा मॉर्नी मॉर्केल (Morne Morkel), अभिषेक नायर (Abhishek Nair) आणि रायन टेन ड्यूसकाटे यांनी घेतलीय. पण, आधीच्या दोन मालिकांमध्ये त्यांची कामगिरी चांगलीच आहे. खेळाडूंनी त्यांच्याशी जुळवून घेतलेलंही दिसतंय,’ असं रोहित म्हणाला. (Rohit Sharma on Gambhir)

रोहित शर्मा यापूर्वी भारतीय संघात असताना गौतम गंभीरसोबत खेळलेला आहे. तर अभिषेक नायर हा मुंबई संघाकडून खेळताना रोहितचा सीनिअर होता. ‘मी गौतम आणि अभिषेक यांना खूप वर्षं ओळखतो. बाकी प्रशिक्षक म्हणून प्रत्येकाची वेगळी शैली असते. क्रिकेटचा प्रत्येकाचा दृष्टिकोणही वेगळा असतो. संघ म्हणून सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे,’ असं रोहित म्हणाला. (Rohit Sharma on Gambhir)

(हेही वाचा- India Win Asian Champions Trophy : चीनवर १-० ने मात करत भारताने सलग दुसऱ्यांदा जिंकला आशियाई चॅम्पियन्स करंडक )

जून महिन्यापासून गौतम गंभीर आणि त्याचा प्रशिक्षकांचा चमू एकत्र आली आहे. नवीन हंगामात चॅम्पियन्स करंडक आणि आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धांवर भारताने लक्ष केंद्रीत केलं आहे. (Rohit Sharma on Gambhir)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.