-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (M. S. Dhoni) सध्या अमेरिकेत आपल्या मित्रांबरोबर सुट्टी घालवत आहे. या दरम्यान त्याने अमेरिकन फुटबॉलच्या एका सामन्याला हजेरीही लावली. धोनीचा एक खास मित्र हितेश संघवीने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात ही मित्रमंडळी खाजगी जेटने प्रवास करताना आणि अमेरिकन फुटबॉलच्या सामन्याला हजेरी लावताना दिसतात. ‘या खास मित्रांबरोबर अमेरिका आणि अमेरिकन फुटबॉलची एक खास सफर,’ असं हितेशने या पोस्टबद्दल लिहिलं आहे.
(हेही वाचा- One Nation One Election कधी लागू करणार ?; अमित शाह यांनी सांगितला कालावधी)
यापूर्वी टी-२० विश्वचषका दरम्यानही धोनी अमेरिकेत दिसला होता. सध्या धोनीच्या आयपीएल (IPL) सहभागावरून जोरदार चर्चा रंगली आहे. चेन्नई सुपर किंग्ज या त्याच्या फ्रँचाईजीला (CSK Franchise) त्याला स्वत:कडेच राखायचं आहे. त्यासाठी रिटेंशन नियमाचा नीट आढावा घेण्याची त्यांची रणनीती चर्चेत आहे. (M. S. Dhoni)
View this post on Instagram
यावर्षी मे आणि जून महिन्यात धोनी इंडियन प्रिमिअर लीगकडून खेळला होता. पण, दुखापतीमुळे तो पूर्ण हंगाम खेळू शकला नव्हता. यंदा चेन्नई फ्रँचाईजीने धोनी ऐवजी संघाचं नेतृत्वही ऋतुराज गायकवाडकडे (Ruturaj Gaikwad) सोपवलं आहे. ४३ वर्षीय धोणीने यंदाची आयपीएल ही त्याची शेवटची स्पर्धा असल्याचेच संकेत दिले आहेत. पण, चेन्नई फ्रँचाईजीला तो अजूनही संघात हवा आहे. त्याला कायम राखण्यासाठी रिटेंशनच्या नियमांत बदल करण्याची त्यांची मागणी आहे. निवृत्त खेळाडूंसाठी अननुभवी खेळाडूंसारखा मोबदला असावा अशी त्यांची मागणी आहे. म्हणजेच त्यांना काही लाखांमध्ये धोनीला आपल्याकडे राखता येईल, अशी चेन्नई संघाची रणनीती आहे. (M. S. Dhoni)
(हेही वाचा- Bhiwandi मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर मशिदीजवळ दगडफेक)
त्यामुळे रिटेंशन नियमाचीही जोरदार चर्चा रंगते आहे. बीसीसीआयने यावर अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. किंवा धोनीनेही खेळत राहण्यावर आपलं मत उघडपणे व्यक्त केलेलं नाही. (M. S. Dhoni)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community