GMR buy Stake in English Club : दिल्ली कॅपिटल्सचे मालक जीएमआरची इंग्लिश काऊंटी संघात गुंतवणूक 

GMR buy Stake in English Club : जीएमआर समुह हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहमालक आहे

118
GMR buy Stake in English Club : दिल्ली कॅपिटल्सचे मालक जीएमआरची इंग्लिश काऊंटी संघात गुंतवणूक 
GMR buy Stake in English Club : दिल्ली कॅपिटल्सचे मालक जीएमआरची इंग्लिश काऊंटी संघात गुंतवणूक 
  • ऋजुता लुकतुके 

जीएमआर हा देशातील आघाडीचा बांधकाम व्यावसायिक समुह आता क्रीडा क्षेत्रातही चांगलाच स्थिरावताना दिसतो आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून त्यांच्याकडे दिल्ली फ्रँचाईजीची सहमालकी होती. आता त्यांनी इंग्लिश काऊंटीतील एक महत्त्वाचा संघ हॅम्पशायरमध्येही गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे इंग्लिश काऊंटीत एवडी मोठी परदेशी गुंतवणूक पहिल्यांदाच होतेय. ती करणारी कंपनी भारतीय असेल. हॅम्पशायरमधील ४९ टक्के हिस्सेदारी जीएमआरने खरेदी केली आहे. आणि येणाऱ्या काळात उर्वरित ५१ टक्के हिस्सेदारीही खरेदी करण्याचा त्यांचा विचार आहे. (GMR buy Stake in English Club)

(हेही वाचा- Bhiwandi मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर मशिदीजवळ दगडफेक)

आतापर्यंतचा व्यवहार हा १२०० कोटी रुपयांचा असल्याचं बोललं जातंय. जीएमआर समुहाची ही गुंतवणूक फक्त क्रिकेट पूरती मर्यादित नसेल. तर यामुळे त्यांच्याकडे युटिलिटा बोल, हिल्टन हॉटेल आणि १८ होल असलेलं गोल्फ कोर्ट यांचाही ताबा आला आहे. आयपीएल बरोबरच युएई, अमेरिका येथील क्रिकेट लीगमध्येही जीएमआर समुहाची गुंतवणूक आहे. (GMR buy Stake in English Club)

इंग्लिश काऊंटीमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात खाजगीकरणाचं वारं वाहत आहे. वर्षाच्या सुरुवातीला १८ क्रिकेट क्सबना इंग्लिश क्रिकेट मंडळाने खाजगी गुंतवणुकीसाठी परवानगी दिली. आणि त्यापैकी प्रत्यक्षात आलेला हा पहिला व्यवहार आहे. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईटरायडर्स, लखनौ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स या फ्रँचाईजींनीही इंग्लिश काऊंटीत गुंतवणूक करण्यात रस दाखवला आहे. (GMR buy Stake in English Club)

(हेही वाचा- Rohit Sharma on Gambhir : रोहित शर्माने ‘या’ दोन शब्दांत केलं गौतम गंभीरचं वर्णन)

इंग्लिश क्रिकेट मंडळ सध्या आर्थिक संकटाशी झुंजतंय. त्यामुळे त्यांना काऊंटी स्पर्धा आयोजित करतानाही चणचण जाणवत आहे. अशावेळी स्पर्धा तसंच काऊंटी क्लबनाही त्यांनी काही प्रमाणात खाजगीकरणाची मुभा दिली आहे. ‘इंग्लंडमध्ये या खाजगीकरणाच्या मोहिमेला प्रायव्हटायझेशन ऑफ हंड्रेड असं म्हटलं जातंय. भारतात क्रिकेटमध्ये पैसा आहे. त्यामुळे तिथल्या क्लबकडे पैसा आहे. त्यांनीच इंग्लिंडमध्ये पैसा गुंतवायची तयारी दाखवलीय यात आश्चर्य नाही,’ असं या धडामोडींची माहिती असलेल्या इंग्लिश सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. (GMR buy Stake in English Club)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.