Instagram Accounts Locked : १३ ते १७ वयोगटातील मुलांची इन्स्टाग्राम खाती आता प्रायव्हेट राहणार 

Instagram Accounts Locked : इन्स्टाग्राम खात्याच्या सुरक्षेसाठी हा नियम आहे 

54
Instagram Accounts Locked : १३ ते १७ वयोगटातील मुलांची इन्स्टाग्राम खाती आता प्रायव्हेट राहणार 
Instagram Accounts Locked : १३ ते १७ वयोगटातील मुलांची इन्स्टाग्राम खाती आता प्रायव्हेट राहणार 
  • ऋजुता लुकतुके 

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया ॲपने आपल्या नियमावलीत काही महत्त्वाचे बदल करताना तरुण किंवा १७-१८ वर्षांच्या मुलांच्या इन्स्टाग्राम खात्याच्या सुरक्षिततेसाठी काही ठोस पावलं उचलली आहेत. इथून पुढे नियमानुसार, तरुण मुलांची खाती ही गुप्तच राहतील. ‘टीन अकाऊंट्स’ असं या फिचरचं नाव आहे. म्हणजे तुम्ही या खात्यांवर गेलात तर तुम्हाला खातं कुलुपबंद आहे (अकाऊंट इज लॉक्ड) असा संदेशच दिसेल. अर्थात, मित्र आणि फॉलोअर्ससाठी खातं खुलं असेल. (Instagram Accounts Locked )

(हेही वाचा- Jammu and Kashmir : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला उत्साहात सुुरुवात)

१३ ते १७ वयोगटातील मुलांसाठी हा नियम लागू असेल. या खात्यांच्या सुरक्षाविषयक तरतूदींमध्येही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत पब्लिक असलेली खातीही आता गुप्त होतील. फॉलोअर लिस्टच्या बाहेरचा कुणीही अशा व्यक्तीशी इन्स्टाग्रामवर संपर्क करू शकणार नाही. किंवा खात्यावरील मजकूर पाहू किंवा वाचूही शकणार नाही. त्यावर लाईक, शेअर किंवा संदेश लिहू शकणार नाही. (Instagram Accounts Locked )

या मुलांनी कशाप्रकारचा इन्स्टाग्राम मजकूर पाहावा यावरही आपोआप बंधन येणार आहेत. रिल्सवरील सर्व प्रकारचा मजकूर या मुलांना पाहता येणार नाही, अगदी तो सार्वजनिक असला तरीही. १६ आणि १७ वयोगटातील मुलं या सुरक्षा प्रणालीतून बाहेर पडू शकतील. पण, त्यासाठी त्यांच्या किमान एका पालकाची परवानगी त्यांना लागेल. आणि मुलं काय पाहतात ते पालकांना पाहता येईल. तर सोळा वर्षांखालील मुलांना या सुरक्षा नियमांमधून सुटका करून घेण्यासाठी पालकांची पूर्ण संमती मिळवावी लागेल. (Instagram Accounts Locked )

(हेही वाचा- Lalbaugcha Raja 2024 : २३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन)

१३ ते १७ वयोगटातील मुलांना आता इन्स्टाग्रामवर तरुणांसाठी असलेली खातीच उघडता येतील. येत्या ६० दिवसांत सुरुवातीला अमेरिका, कॅनडा, युके आणि ऑस्ट्रेलियात ही खाती सुरू होतील. त्यानंतर युरोप आणि आशियात ती उपलब्ध होतील. खातं उघडतानाच तरुणांना सुरक्षाविषयक नियम स्वीकारावे लागतील. इतकंच नाही तर अशा खात्यांमध्ये रात्री १० ते सकाळी ७ या काळात स्लीप मोड आपोआप सुरू होईल. या काळात तुमचं इन्स्टाग्राम खातं अपडेट होत नाही, त्यावर नवीन संदेश येत नाही. किंवा नोटिफिकेशनही बंद राहतात. (Instagram Accounts Locked )

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.