Chess Olympiad 2024 : सहाव्या फेरी अखेर भारतीय पुरुष व महिला संघ आघाडीवर

Chess Olympiad 2024 : या आधीच्या स्पर्धेत भारताने दोन कांस्य जिंकली होती. 

99
Chess Olympiad 2024 : सहाव्या फेरी अखेर भारतीय पुरुष व महिला संघ आघाडीवर
  •  ऋजुता लुकतुके

यंदाच्या बुद्धिबळ ऑलिंम्पियाडमध्ये (Chess Olympiad 2024) भारताचे पुरुष आणि महिला संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. स्पर्धेच्या सहा फेऱ्या आतापर्यंत पार पडल्या आहेत. आणखी ५ बाकी आहेत. पण, भारतीय संघ मजबूत कामगिरी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघ स्पर्धेच्या मध्यावर आघाडीवर आहेत आणि त्यांच्या यशात भागिदार नाही. म्हणजे भारतीय संघांना मिळालेली आघाडी विभागून नाही. १८० देश ज्या स्पर्धेत उतरतात अशा स्पर्धेत निर्विवाद आघाडी राखण्याची किमया भारतीय संघांनी केली आहे.

यात सगळ्यात उठून दिसला तो अर्जुन एरिगसी. जागतिक क्रमवारीत सध्या चौथ्या स्थानावर असेलल्या अर्जुनने आपले सहापैकी सहा सामने जिंकले आहेत. अगदी माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसनही त्याच्या सामन्यांना हजेरी लावताना दिसत आहे. प्रग्यानंदा आणि गुकेश यांनी पहिले दोन सामने खेळल्यानंतर अर्जुन तिसरा सामना खेळतो. यात तो एकदाही हरलेला नाही. तर विदिथ गुजरातीनेही यशात आपला वाटा उचलला आहे.

(हेही वाचा – Pune Ganpati Visarjan : पुण्यात २७ तास उलटूनही मिरवणूका सुरू; विविध भागात वाहतूक कोंडी)

महिलांमध्ये अशी चमक दाखवली आहे ती दिव्या देशमुखने. खासकरून आर्मेनिया विरुद्धच्या सामन्यात दिव्याचं यश उठून दिसलं. कारण, वैशाली, हरिका आणि तानिया या इतर तिघांनीही आपापले सामने बरोबरीत सोडवलेले असताना एकट्या दिव्याने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला. भारताला महत्त्वाचा निर्णायक विजय मिळवून दिला. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर बुधवारी सहावी फेरी सुरू होईल. तेव्हा महिला व पुरुष संघांचा मुकाबला चीनशी असेल. चीनच्या संधात जगज्जेता डिंग लिरेन खेळतोय खरा. पण, त्याने नुकताच एक सामना गमावला आहे. त्याचाच फटका चीनला क्रमवारीत बसला आहे. पण, गतलौकिक पाहता, चीनबरोबरची लढाई हीच स्पर्धेतील प्रथम स्थान टिकवून ठेवण्यासाठी निर्णायक लढाई असेल. (Chess Olympiad 2024)

(हेही वाचा – Pune Hit and run: एकुलता एक मुलगा गमावला, १४ वर्षीय प्रेमचा उपचारादरम्यान मृत्यू)

सहाव्या फेरीनंतरची विजयी क्रमवारी –

खुला गट – १. भारत (१२ गुण), २ ते ४. व्हिएतनाम, चीन व इराण (११ गुण), ५. उझबेकिस्तान (१०)

महिला गट – १. भारत (१२ गुण), २ व ३. जॉर्जिया, पोलंड (११ गुण), ४ व ५. अमेरिका, आर्मेनिया (१० गुण)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.