- ऋजुता लुकतुके
भारतीय टेनिस असोसिएशन अर्थात, आयटाने ज्येष्ठ व्यावसायिक भारतीय टेनिसपटूंच्या देशाकडून न खेळण्याच्या कृतीबद्दल उघड नाराजी व्यक्त केली आहे. स्वीडन विरुद्धच्या डेव्हिस चषक सामन्यात भारताचा ०-४ असा दारुण पराभव झाला. यात सुमित नागल आणि युकी भांबरीची अनुपस्थिती भारताला भोवली. खासकरून सुमित नागलने या सामन्यातून माघार घेण्यासाठी दुखापतीचं कारण दिलं होतं. पण, सध्या तो चीनमध्ये एटीपी स्पर्धेत खेळत आहे.
युकी भांबरीनेही भारताकडून न खेळण्याचं ठोस कारण दिलं नाही. त्यामुळे व्यावसायिक टेनिसपटूंना देशाकडून खेळण्याचं महत्त्व वाटत नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘सुमित आणि युकी खेळले असते तर भारतीय संघाला नक्की फरक पडला असता. सुमितने पाठदुखीचं कारण दिलं होतं. पण, आता तो चीनमध्ये खेळतोय. अशावेळी त्याने खरी परिस्थिती असोसिएशनला सांगायला हवी होती,’ असं टेनिस असोसिएशनचे सचिव अनिल धुपार म्हणाले. युकी व सुमित उपलब्ध न झाल्यामुळे रोहीत राजपाल यांच्याकडे दुहेरीतील जोडी सोडली तर पदार्पण करणाऱ्या खेळाडूंचाच पर्याय उरला. (Davis Cup 2024)
(हेही वाचा – One Nation One Election: ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटची मंजूरी)
🎾DAVIS CUP
India lost to host Sweden 0-3 in the Davis Cup World Group I tie.
Sriram Balaji lost to Elias Ymer🇸🇪 4-6, 2-6
Ramkumar Ramanathan lost to Leo Borg🇸🇪 3-6, 4-6
S. Balaji/R. Ramanathan lost to A. Goransson/F. Bergavi🇸🇪 3-6, 4-6 pic.twitter.com/oRp0r05gl4
— SPORTS ARENA🇮🇳 (@SportsArena1234) September 15, 2024
खेळाडूंना भारतीय संघातून खेळण्यासाठी विनंती करावी लागते याविषयी धुपार यांनी खेद व्यक्त केला. ‘डेव्हिस चषक ही आंतररराष्ट्रीय स्पर्धा आहे. तुमची संघात निवड झालेली असेल तर राष्ट्रीय संघात तुम्ही खेळलंच पाहिजेत. तसेच नियम हवेत. इथं आम्हाला निलंबित खेळाडू शशीकुमारला सरावासाठी उपलब्ध राहावा म्हणून विनंती करावी लागली, अशी परिस्थिती आहे. हे बदललं पाहिजे,’ असं धुपार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.
स्वीडन विरुद्ध श्रीराम बालाजी आणि रामनाथन रामकुमार हे दुहेरीतील खेळाडू एकेरीचा सामनाही खेळले. मह दुहेरीतही हीच जोडी खेळली. परिणामी, चारही सामन्यात भारताचा पराभव झाला. खेळाडू आणि टेनिस असोशिएशनमधील बेबनाव समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. डेव्हिस चषकासाठीच्या संघ निवडीवरून यापूर्वीही वाद झालेले आहेत. (Davis Cup 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community