Chhattisgarh मध्ये CAF जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर केला गोळीबार! २ जवान हुतात्मा, कारण काय?

83
Chhattisgarh मध्ये CAF जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर केला गोळीबार! २ जवान हुतात्मा, कारण काय?
Chhattisgarh मध्ये CAF जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर केला गोळीबार! २ जवान हुतात्मा, कारण काय?

छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) बुधवारी छत्तीसगड सशस्त्र दलाच्या (CAF) सैनिकाने जेवणाच्या वेळी मिरची न दिल्याने त्याच्या सर्व्हिस रायफलने गोळीबार केला. एक जवान गोळी लागल्याने तर दुसरा शॉक लागल्याने हुतात्मा झाला. दरम्यान, दोन जवान जखमी झाले आहेत. त्यातील एकाच्या दोन्ही पायाला गोळ्या लागल्या होत्या आणि दुसऱ्या पायाला स्पर्श करून निघून गेल्या होत्या. दोघांना कुस्मी सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

हे प्रकरण बलरामपूर जिल्ह्यातील सामरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भुताही कॅम्पशी संबंधित आहे. अजय सिदर (Ajay Siddar) असे गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव आहे. ते CAF च्या 11 व्या बटालियनमध्ये तैनात आहेत. गोळ्यांचा आवाज ऐकून जवानांनी घटनास्थळ गाठून अजयला ताब्यात घेतले. बलरामपूरचे एएसपी शैलेश पांडे (नक्षल ऑपरेशन) यांनी सांगितले की, घटनेवेळी उपस्थित शिपाई संदीप पांडे शॉक लागल्याने खाली पडला. त्याला कुस्मी आरोग्य केंद्रात आणले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. (Chhattisgarh)

नेमकं काय घडलं?
अजय सिदर जेवण करण्यासाठी बसला असताना त्यांनी जेवण देणारा शिपाई रुपेश पटेल यांच्याकडून मिरची मागवली. रुपेश यांनी मिरची देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी तेथे उपस्थित गार्ड कमांडर अंबुज शुक्ला यांनी रुपेश पटेलला पाठिंबा दिल्याने वाद आणखी वाढला. रागाच्या भरात अजय सिदर जेवण सोडून उठला आणि त्याने रुपेश पटेलवर त्याच्या इन्सास रायफलने गोळीबार केला, त्यात तो जागीच हुतात्मा झाला. अजयने अंबुज शुक्ला यांच्या पायावरही गोळी झाडली. यावेळी तेथे उपस्थित जवान राहुल बघेल याने अजय सिदर याला पकडून नियंत्रणात आणले. कुस्मी सामुदायिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर अंबुज शुक्ला यांना अंबिकापूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. (Chhattisgarh)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.