Anant Chaturdashi : एकाच दिवशी ३६३ मेट्रिक कचरा, तर उत्सवात ५०० टन निर्माल्य झाले जमा

209
Anant Chaturdashi : एकाच दिवशी ३६३ मेट्रिक कचरा, तर उत्सवात ५०० टन निर्माल्य झाले जमा
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi) दिवशी मुंबईतील अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळी गणपती बाप्पांचे विसर्जन झाले. या विसर्जन स्थळांवर महापालिकेच्या वतीने निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. या सर्व निर्माल्य कलशात या उत्सवा दरम्यान तब्बल ५०० मेट्रिक टन निर्माण जमा झाले आहे. तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील सर्व समुद्रकिनारे आणि इतर विसर्जन स्थानावर मोठ्या गणपती बाप्पांच्या मिरवणुकीत सहभागी होत तसेच बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. यामुळे समुद्र किनारे, चौपाटी तसेच विसर्जन स्थळे स्वच्छ करून नागरिकांना स्वच्छ करून दिली. या स्वच्छतेत ३६३ कचरा व इतर साहित्य जमा करण्यात आले.

मुंबई महानगरातील श्री गणेश मूर्ती विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून यंदाही विविध नागरी सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली होती. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे सुमारे पंधरा हजार कर्मचारी तैनात होते. (Anant Chaturdashi)

(हेही वाचा – Jio Outage : मंगळवारी भारतात जिओ नेटवर्कची सेवा विस्कळीत का झाली होती?)

पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी यंदा मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. निर्माल्य संकलनासाठी ५०० हून अधिक निर्माल्य कलश आणि ३५० निर्माल्य वाहक वाहने नेमलेली होती. अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) निमित्त मूर्ती विसर्जनानंतर स्वराज्य भूमी (गिरगाव), दादर, चिंबई, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ, गोराई समुद्र चौपाटी तसेच इतर सर्वत्र देखील विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले होते.

स्वच्छतेतून एकूण ३६३ मेट्रिक टन घनकचरा

त्यानुसार मंगळवारी १७ सप्टेंबर २०२४ दिवसभर, संपूर्ण रात्रभर आणि बुधवारी १८ सप्टेंबर २०२४) संपूर्ण दिवसभर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अथक, अखंड कार्यरत राहून स्वच्छता मोहीम राबवली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सुमारे सात हजार कामगार, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या मदतीने केलेल्या स्वच्छतेतून एकूण ३६३ मेट्रिक टन घनकचरा जमा करण्यात आला. स्वच्छतेविषयक ही कार्यवाही निरंतरपणे सुरू राहणार आहे. एवढेच नव्हे, तर संपूर्ण मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवांचे परिसर, विसर्जन मिरवणुकांचे मार्ग इत्यादी ठिकाणी देखील स्वच्छतेची कार्यवाही अखंडपणे सुरू आहे.

(हेही वाचा – Chhattisgarh मध्ये CAF जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर केला गोळीबार! २ जवान हुतात्मा, कारण काय?)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बुधवारी १८ सप्टेंबर २०२४ रोजी विविध चौपाटींना भेट देत स्वच्छता विषयक कार्यवाहीची पाहणी केली तसेच आवश्यक ते निर्देश दिले. महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. चौपाट्यांवरील विशेष स्वच्छता मोहिमेत खाद्यपदार्थांचे वेष्टण (रॅपर्स), पाण्याच्या बाटल्या, पिशव्या यांसह पादत्राणे आणि इतर वस्तू देखील मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आल्या आहेत. त्यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्याचे तसेच निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याचे निर्देश आयुक्त गगराणी यांनी दिले आहेत. तसेच, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनीदेखील बुधवारी चौपाट्यांसह मुंबईतील विविध ठिकाणी भेट देत स्वच्छता विषयक कार्यवाहीचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले. (Anant Chaturdashi)

विसर्जन स्थळांवर मिळून साडेपाचशे मेट्रिक टन निर्माल्य

यंदा गणेशोत्सवात संकलित निर्माल्य पासून सेंद्रिय खत करण्याची कार्यवाही घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे. यंदा गणेशोत्सवामध्ये सुमारे साडेपाचशे मेट्रिक टन निर्माल्य संकलन झाले आहे. महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये असणाऱ्या विविध ३७ सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पांमध्ये हे निर्माल्य नेण्यात आले आहे.

(हेही वाचा – Central Government: ‘चांद्रयान-४’ मोहिमेसाठी २ हजार १०४ कोटींची तरतूद! मंत्रिमंडळाची मंजुरी)

निर्माल्यापासून खत निर्मितीला सुरुवात…

मुंबईतील २५० नैसर्गिक आणि २०४ कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मिळून ५०० निर्माल्य कलश पुरवण्यात आले होते. तसेच ३५० हून अधिक वाहने आणि ६ हजाराहून अधिक मनुष्यबळाद्वारे संकलित केलेले हे निर्माल्य आता खत निर्मितीसाठी पाठवण्यात आले आहे. निर्माल्यापासून खत निर्मितीला सुरुवात देखील झाली आहे. साधारणपणे एका महिन्यात या निर्माल्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होईल. हे खत महानगरपालिका उद्यानांमध्ये वापरासाठी देण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात येत आहे. (Anant Chaturdashi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.