Jai Malokar: मिटकरींची गाडी फोडणारा मनसैनिक जय मालोकारचा जबर मारहाणीमुळे मृत्यू!

176
Jai Malokar: मिटकरींची गाडी फोडणारा मनसैनिक जय मालोकारचा जबर मारहाणीमुळे मृत्यू!
Jai Malokar: मिटकरींची गाडी फोडणारा मनसैनिक जय मालोकारचा जबर मारहाणीमुळे मृत्यू!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केल्यानंतर मनसे आक्रमक झाली. त्यांनी अकोल्यात आमदार मिटकरींची मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात गाडी फोडली. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये मनसैनिक जय मालोकार (Jai Malokar) यांचाही समावेश होता. जय मालोकार यांचा गाडी फोडल्याच्या घटनेच्या दिवशी मृत्यू झाला होता. आता जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा (Jai Malokar) जबर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं कारण शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणेच्या पूरस्थिती नंतर टीका केली होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना सुपरीबाज म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे राज्यभर मनसैनिक आक्रमक झाले होते. तर अकोल्यात मनसे सरचिटणीस कर्णबाळा दूनबळे यांच्या पत्रकार परिषदेनंतर विश्रामगृह येथे आलेले आमदार अमोल मिटकरींच्या गाडीला लक्ष करण्यात आलं. यावेळी मनसे पदाधिकारी यांनी आमदार मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली. त्यानंतर आमदार मिटकरींच्या तक्रारीवरून मनसैनिक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र या प्रकरणाला त्यावेळी वेगळं वळण लागले. गाडी तोड प्रकरणात सहभागी असलेले मनसैनिक जय मालोकार यांचा यावेळी मृत्यू झाला होता. हा मृत्यू हृदय विकाराने झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनी जय मालोकार (Jai Malokar) यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली होती.

मृत्यूला वेगळं वळण!

दरम्यान मृतक जय मालोकार (Jai Malokar) यांच्या मृत्यूचे कारण हृदय विकाराचा झटका असल्याचं सांगितलं जातं असतानाच आता शवविच्छेदन अहवालात आलेल्या धक्कादायक कारणामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. जय मालोकार यांचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान जय मालोकार यांच्या कुटूंबीयांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. व त्याच्या शरिरावर ह्या जखमा आल्या कुठून याचीही चौकाशी करावी अशी मागणी जय ममालोकारचा (Jai Malokar) भाऊ विजय मालोकार याने केली आहे.

राज ठाकरे यांची भेट!

जय मालोकार (Jai Malokar) यांचा मृत्यू झाल्यानंतर काहीच दिवसांत विदर्भाच्या दौर्यावर असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे हे अकोला दौऱ्यावर असतांना त्यांनी मृतक जय मालोकार यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी मनसे जय मालोकार यांच्या कुटूंबीयांसोबत असल्याचं म्हटलं होतं.

नेमकं शवविच्छेदन अहवालात काय?

जय मालोकार (Jai Malokar) यांचा मृत्यू जबर मारहानीमुळे झाला. पाठीवर छातीवर डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण. छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर आहेत. डोक्याला सुद्धा गंभीर मारहाण झाली आहे. पोस्टमार्टमवेळी मेंदूवर मोठ्या प्रमाणात सूज. त्यामुळे मेंदूचे वजन वाढलं. मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूना गंभीर इजा, या सर्व गोष्टींमुळे ‘न्यूरोजनिक शॉक’मुळे मृत्यू झाला.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.