दापोलीतील Suvarnadurga Fort ची जागतिक वारसा यादीत होणार नोंद

२ ऑक्टोबर रोजी युनेस्काेचे एक पथक पाहणीसाठी दापाेलीत दाखल हाेणार आहे. हे पथक सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी करणार आहे.

90

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दापोली तालुक्यातील हर्णै सुवर्णदुर्ग किल्लाची (Suvarnadurga Fort) जागतिक वारसा यादीत नोंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी युनेस्कोचे तज्ज्ञांचे पथक दापाेलीत दाखल हाेणार आहे. युनेस्कोच्या मान्यतेनंतर सुवर्णदुर्ग किल्ला जागतिक पर्यटन क्षेत्रात जगाच्या नकाशावर झळकणार आहे.

(हेही वाचा M. S. Dhoni : महेंद्रसिंग धोनी अमेरिकेत घालवतोय सुट्टी; दिसला ‘या’ खेळाच्या मैदानावर )

२ ऑक्टोबरला युनेस्काेचे पथक दापाेलीत दाखल हाेणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला म्हणून हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ला  (Suvarnadurga Fort) ओळखला जाताे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या किल्ल्याचा समावेश हाेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसा प्रस्ताव शासनाकडून युनेस्काेला पाठविण्यात आला आहे. त्यासाठी २ ऑक्टोबर रोजी युनेस्काेचे एक पथक पाहणीसाठी दापाेलीत दाखल हाेणार आहे. हे पथक सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी करणार आहे. युनेस्कोतील तज्ज्ञ पथकाच्या भेटीमुळे राज्यशासन खडबडून जागे झाले आहे. या पार्श्वभूमीवर याठिकाणी १८ सप्टेंबर राेजी स्वच्छता माेहिमेचेही आयाेजन करण्यात आले आहे. त्याचबराेबर शासनाने किल्ल्याच्या डा गडुजीसह इतर कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. येथील गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला दरम्यान या निधीतून जेटी बांधण्यात येणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.