कॉंग्रेस महिलाविरोधी; भगिनींनो सावध व्हा! Sanjay Nirupam यांचा आरोप

77
कॉंग्रेस महिलाविरोधी; भगिनींनो सावध व्हा! Sanjay Nirupam यांचा आरोप
  • प्रतिनिधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून काँग्रेस नेत्यांनी या योजनेचा विरोध केला. आता कॉंग्रेस सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजना बंद करु, असे विधान आमदार सुनील केदार यांनी केले आहे. यावरून काँग्रेसची भूमिका महिलाविरोधी आहे, यावर शिक्कामोर्तब झाल्याचे शिवसेना उपनेते, प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी म्हटले आहे. दरम्यान दुटप्पी आणि महिलाविरोधी काँग्रेसपासून भगिनींनी सावध राहावे, असे आवाहन निरुपम यांनी बुधवारी (१८ सप्टेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत केले.

(हेही वाचा – Anant Chaturdashi : एकाच दिवशी ३६३ मेट्रिक कचरा, तर उत्सवात ५०० टन निर्माल्य झाले जमा)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याचे षडयंत्र कॉंग्रेस सुरूवातीपासून रचत आहे. राज्य सरकारकडे पैसे नाहीत, ही योजना केवळ दिखावा आहे, असे सांगत जनतेची दिशाभूल केली जात आहे. काँग्रेसकडून योजनेचा अपप्रचार सुरु असला तरी दुसऱ्या बाजूला राज्यभरात लाडक्या बहिणींची योजनेसाठी नोंदणी सुरू आहे. रक्षाबंधनापूर्वी सरकारने १ कोटी ६० लाख महिलांच्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा केले. त्यानंतरही काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र न्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला फटकारले. यावरुन काँग्रेसला किती द्वेष आहे हे दिसून येते, असे निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले.

(हेही वाचा – BEST कडून प्रवाशांची लूट)

लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारची प्रतिमा उंचावली आहे. विरोधक त्यामुळे अस्वस्थ झाल्याचा टोला निरुपम (Sanjay Nirupam) यांनी लगावला. तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत माझी लाडकी बहीण योजना कोणीही बंद होणार नाही, असे निरुपम यांनी ठणकावले. निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असून १५०० रुपयांत आणखी वाढ करण्याची हमी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिल्याची आठवण निरूपम यांनी करून दिली.

(हेही वाचा – Pakistan मध्ये आता पाणीबाणी; भारताने उचलले ‘हे’ पाऊल)

काँग्रेस दुटप्पी

काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर यावेळी निरुपम (Sanjay Nirupam) यांनी सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले की झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्यासोबत सत्तेत बसलेल्या काँग्रेसकडून मय्या सन्मान योजना लागू केलेली आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे. काँग्रेस पक्षाकडून तिथे मय्या सन्मान संमेलन देखील आयोजित केली जात आहेत, मात्र महाराष्ट्रातील महिलांना सरकारकडून पैसै मिळत असतील तर काँग्रेसला पोटदुखीचे कारण का, असा सवाल निरूपम यांनी केला. तसेच देशातील महिलांमध्ये कॉंग्रेस भेदभाव करत असल्याचे ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.