- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील श्री गणेशोत्सवातील अनंत चतुर्दशी निमित्त प्रमुख मूर्ती विसर्जन सोहळा पार पडल्यानंतर मध्यरात्रीनंतर १२.३० वाजल्यापासून बॅनर, फलक आणि इतर प्रदर्शित साहित्य हटविण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या परवाना खात्याने हाती घेतली आहे. या अंतर्गत बुधवारी १८ सप्टेंबर २०२४ सायंकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे तब्बल १८ तासांमध्ये एकूण १४ हजार ३७० इतके साहित्य काढून टाकण्यात आले आहे. (BMC)
यामध्ये प्रामुख्याने श्री गणेशोत्सवामध्ये प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिलेले साहित्य समाविष्ट आहे. परवानगीची मुदत संपल्याने ते काढून टाकण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त अनधिकृतरित्या प्रदर्शित केलेले बॅनर, फलक, तात्पुरते प्रवेशद्वार, भित्तीपत्रके अशा सर्व बाबींचाही यात समावेश आहे. (BMC)
(हेही वाचा – हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या बांगलादेशबरोबर क्रिकेट मालिका नको; Aditya Thackeray यांचा केंद्रावर हल्लाबोल)
परवाना खात्याने हटवलेल्या साहित्याचे वर्गीकरण लक्षात घेता धार्मिक स्वरूपाचे ७ हजार ७१५ बॅनर, ३ हजार १७४ फलक (बोर्ड) आणि ५७९ पोस्टर्स; राजकीय स्वरूपाचे ८०७ बॅनर, ७०५ फलक (बोर्ड), ८७ पोस्टर्स; व्यावसायिक स्वरूपाचे २६० बॅनर, २७ फलक (बोर्ड), ३१ पोस्टर्स तसेच ९८५ झेंडे यांचा यामध्ये समावेश आहे. ही कारवाई निरंतर सुरू असल्याची माहिती परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांच्या निर्देशानुसार उपायुक्त किरण दिघावकर मार्गदर्शनाखाली परवाना अधिक्षक काटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. (BMC)
धार्मिक स्वरूपाचे
बॅनर ७ हजार ७१५
फलक (बोर्ड) ३ हजार १७४
पोस्टर्स ५७९
राजकीय स्वरूपाचे
बॅनर ८०७
फलक (बोर्ड) ७०५
पोस्टर्स ८७
(हेही वाचा – मुंबईत मेरिटनुसार ठरणार विधानसभेचे जागावाटप; Mahavikas Aghadi च्या बैठकीत निर्णय)
व्यावसायिक स्वरूपाचे
बॅनर २६०
फलक (बोर्ड) २७
पोस्टर्स ३१
झेंडे ९८५
हेही पहा –
Join Our WhatsApp Community