- खास प्रतिनिधी
शिवसेना उबाठामध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असून असंतोष वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उबाठाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांनी तिसऱ्यांदा निवडून येण्याची, हॅट्रिक साधण्याची तयारी सुरू केली आहे तर ‘लालबागचा राजा’ मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्या समर्थकांनी समाजमाध्यमावर ‘बदल हवा’ असा प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे शिवडीत उबाठा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. (Shivadi Assembly Constituency)
(हेही वाचा – मुंबईत मेरिटनुसार ठरणार विधानसभेचे जागावाटप; Mahavikas Aghadi च्या बैठकीत निर्णय)
नांदगावकर यांचा पराभव
शिवडी विधानसभा मतदारसंघातून गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत (२०१४ आणि २०१९) शिवसेनेचे (एकसंघ) अजय चौधरी निवडून आले. २०१४ मध्ये चौधरी आणि मनसेचे बाळा नांदगावकर अशी थेट लढत झाली आणि चौधरींनी नांदगावकर यांचा पराभव केला तर भाजपाच्या शलाका साळवी तिसऱ्या आणि काँग्रेसचे मनोज जामसुदकर चौथ्या क्रमांकावर गेले होते. २०१९ मध्येही शिवसेना विरुद्ध मनसे अशीच लढत झाली. मात्र मनसेने तेव्हा नांदगावकर यांच्याऐवजी संतोष नलावडे यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते, त्यातही चौधरी यांनी बाजी मारली तर काँग्रेसचे उदय फणसेकर तिसऱ्या स्थानी होते. (Shivadi Assembly Constituency)
उबाठात गटबाजी
२०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नांदगावकर पुन्हा सक्रिय झाले असून पक्षाने त्यांची शिवाडीची उमेदवारी अगोदरच घोषित केली आहे. मात्र यावेळी शिवसेना एकसंघ नाही. शिवसेना शिंदे आणि शिवसेना उबाठा असे दोन गट असून दोन्ही गटाकडून तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे उबाठा गटातही दोन गट झाले असून चौधरी आणि सुधीर साळवी दोघांनी तयारी केल्याचे कळते. (Shivadi Assembly Constituency)
(हेही वाचा – Ganpati Visarjan : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत २५० मोबाईल फोनवर चोरांचा डल्ला)
प्रचार सुरू
समाजमाध्यमावर तर दोघांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. उबाठाचे शिवडी विधानसभा मतदारसंघ समन्वयक आणि लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना वाढता पाठिंबा मिळत असून यांच्या समर्थकांनी ‘शिवडी विधानसभेत एकच पुकार, आता हवा शिवसेना उबाठाचा युवा आमदार’, तसेच ‘बदल हवा, आमदार नवा’ असा प्रचार सुरू केला आहे. चौधरी यांचेही कार्यकर्ते ‘आमदार अजय चौधरी हॅट्रिक साधणार, इतिहास घडवणार’ असा प्रचार करत आहेत. त्यामुळे कोणालाही एकला तिकीट जाहीर होताच मतदार संघात फूट पडणार हे नक्की. (Shivadi Assembly Constituency)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community