Sion Bridge वर भीषण अपघात; दोन ठार, तीन गंभीर

विसर्जन बघण्यासाठी गिरगावला जाताना झाला अपघात

695
Accident : कोस्टल रोडवर पहिला अपघात; बीएमडब्ल्यूने उडवले कामगाराला

सायन पुलावर (Sion Bridge) भरधाव वेगात जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघात दोन जण ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालय येथे दाखल करण्यात करण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास झाला असून या प्रकरणी सायन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अनिमेश मोरे (२३) आणि असफाक अन्सारी (२८) असे अपघातात (Sion Bridge) ठार झालेल्याची नावे असून अमोल कुंचिकोर्वी (२०), विग्नेश सरवदे (२०)आणि मेहंदी सय्यद (३०) हे तिघे जण जखमी झाले आहे. त्यापैकी विग्नेश याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अनिमेश विग्नेश आणि अमोल हे तिघे विक्रोळी टागोर नगर येथे राहणारे असून असफाक आणि मेहंदी हे दोघे गोवंडी शिवाजी नगर येथे राहणारे आहे.

(हेही वाचा हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या बांगलादेशबरोबर क्रिकेट मालिका नको; Aditya Thackeray यांचा केंद्रावर हल्लाबोल)

बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास विक्रोळी येथे राहणारे तिघे जण एक्टिव्हा मोटारसायकलवरून गिरगाव चौपाटीवर जाण्यासाठी विक्रोळी येथून निघाले होते, तर असफाक आणि मेहंदी हे दोघे बेनाली ३०० बाईकवरून मुंबईतील बडी मशिदीतून दर्शन घेऊन शिवाजी नगर येथे घरी निघाले होते. सायन पुलावरून (Sion Bridge) भरधाव वेगाने जात असताना विघ्नेश हा चुकीच्या बाजूने पुलावरून जात असतांना दोन्ही मोटारसायकल समोरासमोर एकमेकाना धडकून अनिमेश हा पुलावरून खाली फेकला गेला, हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला.

अपघाताची माहिती मिळताच सायन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाचही जखमींना तात्काळ उपचारासाठी सायन रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी अनिमेशला तपासून मृत घोषित केले व चौघांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असता दुपारी असफाक याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून विग्नेश याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी सायन पोलिसांनी चुकीच्या दिशेने गाडी चालविणाऱ्या विग्नेश विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.