आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या (Tirumala Tirupati Devasthan) प्रसादाबद्दल गंभीर आरोप केला आहे. नायडू यांचे कट्टर विरोधक आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या कार्यकाळात तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर व्हायचा, असा अतिशय धक्कादायक आरोप नायडू यांनी केला आहे. (Tirupati Prasadam)
(हेही वाचा – Train Accident : उत्तरप्रदेशमध्ये अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, 14 गाड्या रद्द)
जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या वतीने भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला. प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाणारे तिरुमला प्रसादाचे लाडू निकृष्ट घटकांनी बनवले जातात, अशी धक्कादायक माहिती आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करतांना दिली.
तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे चालवल्या जाणाऱ्या तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात मागणीनुसार, प्रसादाचे लाडू दिले जातात. त्या लाडूंविषयी ही धक्कादायक माहिती समोर आल्याने गदारोळ माजला आहे. तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंवरून मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी वायएसआर काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. “तिरुपतीच्या प्रसादाच्या पवित्र लाडवात शुद्ध तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर केला जात असे. मात्र, आता शुद्ध तुपाचा वापर केला जातो. मंदिरातील सर्व काही स्वच्छ करण्यात आलं आहे. यामुळे गुणवत्ता सुधारली आहे”, असे चंद्राबाबू यांनी स्पष्ट केले आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला गंभीर हानी पोहोचवली आहे. तिरुमला प्रसाद यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या टिप्पण्या अत्यंत दुर्दैवी आहेत. कोणीही असे शब्द बोलू नये किंवा आरोप करू नये, असे स्पष्टीकरण वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी दिल आहे. मात्र जनावरांच्या चरबीचा वापर केला गेला कि नाही, हे मात्र उघड केलेले नाही. (Tirupati Prasadam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community