-
ऋजुता लुकतुके
यावर्षी जून महिन्यात नरेंद्र मोदी (Narendra Modi Salary) यांनी आपले काही सहकारी राजनाथ सिंग, अमित शाह, नितिन गडकरी, निर्मला सीतारमण आणि एस जयशंकर यांच्या साथीने आपला तिसरा कार्यकाळ सुरू केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंडित जवाहरलाला नेहरुंनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान हा देशाचा प्रशासकीय प्रमुख असतो. त्याच्याकडे अनेक प्रशासकयी अधिकार असतात.
त्याचबरोबर भारतीय संविधानाप्रमाणे सध्या पंतप्रधान पदावरील उमेदवाराला १.६६ रुपये प्रती महिना पगार म्हणून मिळतात. यात मूळ वेतन ५०,००० रुपये, संसदीय भत्ता ४५,००० रु, दैनंदिन भत्ता ३,००० रु यांचा समावेश आहे. (Narendra Modi Salary)
(हेही वाचा- Train Accident : उत्तरप्रदेशमध्ये अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, 14 गाड्या रद्द)
याशिवाय पंतप्रधान म्हणून मोदींना शासकीय बंगल्यात राहायला मिळतं. नवी दिल्लीत लोककल्याण मार्ग या रस्त्यावर ७ लोककल्याण मार्ग हे पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान आहे. राजधानी दिल्लीतील हे सगळ्यात सुरक्षित निवासस्थान आहे. इथं राहण्यासाठी नरेंद्र मोदींना कुठलंही भाडं किंवा इतर खर्च करावा लागत नाही. त्यांचा राहण्याचा खर्च सरकार उचलतं. ५ ते ७ लोककल्याण मार्ग हे तीन बंगले या संकुलात येतात. इथं त्यांच्या निवासाबरोबरच त्यांचं कार्यालयही आहे. (Narendra Modi Salary)
पंतप्रधना नरेंद्र मोदींना विशेष सुरक्षा गटाकडून सुरक्षा देण्यात येते. देशातील विशेष महत्त्वाच्या व्यक्तींना अशाप्रकारची सुरक्षा असते. त्यांना एसएसपी दल असंही म्हटलं जातं. जर नेत्यावर कुठलंही संकट आलं तर प्रसंगी आपला जीव देऊन एसएसपीचे जवान नेत्याची रक्षा करतात, असा त्यांचा लौकिक आहे. याशिवाय केंद्रसरकारची झेड दर्जाची अत्युच्च सुरक्षाही पंतप्रधानांना लागू होते. या सुरक्षेचा खर्च अर्थातच, सरकार उचलतं. (Narendra Modi Salary)
याशिवाय नेहमीचा प्रवास आणि आंतरराष्ट्रीय दौरे यासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी एअर इंडिया वन या सेवेचा लाभ घेऊ शकतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या एअरफोर्स वनच्या धर्तीवर एअर इंडिया वनची उभारणी करण्यात आली आहे. हे विमान अत्यंत सुरक्षित आहे. यात सुरक्षित केबिन सह पंतप्रधानांचं हवेतील कार्यालय आणि बैठका सभागृहही आहे. हा खर्चही सरकारकडून केला जातो. (Narendra Modi Salary)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community