-
ऋजुता लुकतुके
विमानातून प्रवास करण्याची हौस कुणाला नसते? विमान प्रवासात आकर्षण असतं ते आपल्याला सेवा देणाऱ्या हवाई सुंदरी आणि इतर स्टाफचं. या आकर्षणातूनच अनेक मुलं किंवा मुलांना विमानात सेवा देणाऱ्या केबिन क्रूचा एक भाग व्हायचं असतं. विमान प्रवासाचं आकर्षण आणि या कर्मचारी वर्गाचं आकर्षक बोलणं यामुळे हे आकर्षण निर्माण झालेलं असतं. पण, तुम्ही अगदी गांभीर्याने या नोकरीचा विचार करत असाल तर तुम्हाला खूप लवकर तसा निर्णय घ्यावा लागेल. कारण, हवाई सुंदरी किंवा इतर केबिन क्रूसाठी विशेष अभ्यासक्रम विमान कंपन्यांकडूनच घेतले जातात. अगदी बारावी उत्तीर्ण मुला, मुलींनाच प्रशिक्षण देऊन तयार करण्याकडे कंपन्यांचा कल असतो. (Cabin Crew Salary)
(हेही वाचा- Narendra Modi Salary : पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती पगार मिळतो? त्यांचे भत्ते, सुविधा किती?)
एअर होस्टेसला फ्लाईट अटेंडंट किंवा केबिन क्रू असंही म्हटलं जातं. शिवाय विमानात पर्सरही आपली सेवा बजावत असतो. एअर होस्टेस ही भारतातील एक ग्लॅमरस किंवा वलयांकीत नोकरी आहे. १७ ते २६ वर्षं वयोगटातील तरुणींचीच मुख्यत्वे या पदासाठी नेमणूक होते. काही विमान कंपन्या तिशीच्या पुढच्या बायकांचा विचार करतात. ही तशी वलयांकीत नोकरी असल्यामुळे तुमची उंची, वजन, दिसणं अशा सगळ्या गोष्टींचा यात विचार केला जातो. (Cabin Crew Salary)
तुमची तंदुरुस्ती, शरीरयष्टी आणि दृष्टीही तपासली जाते. विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना सेवा देणं हे केबिन क्रूचं मुख्य काम आहे. प्रवाशांचं स्वागत करणं, त्यांना त्यांच्या जागेवर बसायला मदत करणं, प्रवासादरम्यान त्यांना पेय, जेवण अशा सुविधा देणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं हे केबिन क्रूचं काम आहे. शिवाय प्रवाशाला गरजेनुसार प्रथमोपचार देणं हे ही केबिन क्रूचं काम आहे. (Cabin Crew Salary)
या नोकरीसाठी बारावीनंतरचा एक वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक आहे. याखेरिज ३ ते ६ महिन्यांचे सर्टिफिकिट अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. यानंतर विमान कंपन्या तुम्हाला सुरुवातीला देशांतर्गत उड्डाणाची संधी देतात. म्हणजेच तुमची नेमणूक देशांतर्गत विमानांमध्ये होते. तुमचा सुरुवातीचा पगार हा साधारणपणे ४५.००० ते ५०,०००० रुपये इतका असतो. याशिवाय तुम्हाला प्रवासादरम्यान काही सुविधा आणि भत्ते मिळतात. अनुभवानुसार, हा पगार प्रती महिना २ ते अडीच लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. (Cabin Crew Salary)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community