Ricky Ponting : रिकी पाँटिंग पंजाब किंग्जचा नवीन मुख्य प्रशिक्षक

Ricky Ponting : पाँटिंग यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक होता 

118
Ricky Ponting : रिकी पाँटिंग पंजाब किंग्जचा नवीन मुख्य प्रशिक्षक 
Ricky Ponting : रिकी पाँटिंग पंजाब किंग्जचा नवीन मुख्य प्रशिक्षक 
  • ऋजुता लुकतुके 

आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी विविध फ्रँचाईजी आपले प्रशिक्षकांविषयीचे धोरणात्मक निर्णय घेताना दिसत आहेत. पंजाब किंग्ज संघाने (Punjab Kings team) ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला (Ricky Ponting) मुख्य प्रशिक्षक म्हणून करारबद्ध केलं आहे. याआधीचे दोन हंगाम ट्रेव्हर बेलिस पंजाब संघाबरोबर होते. पण, त्यांच्या नेतृत्वाखाली पंजाब संघ दोनही वर्षं चांगली कामगिरी करू शकलेला नाही. किंबहुना २००८ ला लीग सुरू झाल्यापासून पंजाबचा संघ एकदाही ती जिंकू शकलेला नाही. अंतिम फेरीतही पोहोचू शकलेला नाही. हा इतिहास आता रिकी पाँटिंग पुसू शकतो का हे पहावं लागेल.

(हेही वाचा- Matka King Suresh Bhagat Murder Case : महिला पोलिसांना धक्काबुकी केल्याप्रकरणी आरोपी मांडवीकरला अटक)

पाँटिंगने आपल्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला २०२० मध्ये अंतिम फेरीपर्यंत नेलं होतं. पाँटिंगने यापूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स अशा दोन संघांबरोबर काम केलं आहे. आताही तो तीन फ्रँचाईजींबरोबर चर्चा करत होता. अखेर पंजाब फ्रँचाईजीला त्याने होकार दिला आहे. (Ricky Ponting)

‘रिकी पाँटिंगला पुढील चार वर्षांसाठी करारबद्ध करताना आम्हाला आनंद होत आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय अनुभव संघाला मैदानावर चांगली कामगिरी करण्यासाठी उपयोगी पडेल. तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षक म्हणूनही त्यांना चांगला अनुभव आहे. आगामी लिलावापूर्वी कुशल खेळाडू शोधून त्यांच्यावर मेहनत घेताना त्यांचा हा अनुभव कामी येईल याची खात्री आहे,’ असं पंजाब किंग्ज संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश मेनन यांनी म्हटलं आहे. (Ricky Ponting)

(हेही वाचा- IPL Mega Auction : आयपीएलचा लिलाव नोव्हेंबरमध्ये परदेशात होणार?)

मागील ११ हंगाम रिकी पाँटिंग (Ricky Ponting) विविध आयपीएल संघांसाठी प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे. यात मुंबई इंडियन्सबरोबर त्याने प्रशिक्षक म्हणून एक विजेतेपदही पटकावलं आहे. २०१८ पासून दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पाँटिंगने चांगली कामगिरी केली आहे. २०२० मध्ये दिल्ली संघ अंतिम फेरीत पोहोचला. तर इतर दोन वेळा हा संघ बाद फेरीत गेला होता.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.