Maharashtra Politics : उबाठा नेत्याची खासदारकी धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात

263
Maharashtra Politics : उबाठा नेत्यांची खासदारकी धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
Maharashtra Politics : उबाठा नेत्यांची खासदारकी धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election 2024) शिवसेना उबाठा (UBT) गटाचे ९ खासदार निवडून आले. आता शिवसेना उबाठा गटाच्या निवडून आलेल्या एका खासदाराच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या शपथपत्रातील एका चुकीवर बोट ठेवत हायकोर्टात (High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)

संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी शिवसेना उबाठा गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला होता. दरम्यान संजय दिना पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या शपथपत्रातील एका चुकीवर बोट ठेवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे संजय दिना पाटील यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

याचिका कुणी दाखल केली ? 

संजय दिना पाटील यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी ज्या व्यक्तीने केली आहे तिचे नाव शहाजी एन. थोरात (Shahaji N. Thorat) आहे. शहाजी थोरात हे टॅक्सी चालक म्हणून काम करतात. थोरात यांनी मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि पराभूत झाले होते. 

(हेही वाचा – mba colleges in mumbai : MBA कोर्स करण्यासाठी मुंबईतील काही सर्वोत्तम एम.बी.ए. कॉलेजेस)

शपथपत्रात नेमकी चूक काय ?  

टॅक्सी चालक असलेले आणि या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले उमेदवार शहाजी थोरात यांनी याचिकेद्वारे पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान दिले आहे. उमेदवारी अर्ज भरताना वडिलांच्या नावासह आईचं नाव नमूद करणं महाराष्ट्र सरकारने अनिवार्य केले आहे. मात्र, पाटील यांनी उमेदवारी अर्जात आपल्या आईचं नाव नमूद केलं नव्हतं. नियमानुसार, या कारणास्तव पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरतो. त्यामुळे, त्यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यानं केली आहे. शिवसेना उबाठा गटाचे संजय दीना-पाटील यांनी भाजपाच्या मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांचा २९ हजार ८००मतांच्या फरकानं पराभव केला होता. (Maharashtra Politics)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.