मुंबई महानगरपालिकेचे पहिले स्वयंचलित वाहनतळ!

२१ मजली वाहनतळामध्ये साधारणपणे २४० वाहने उभी करता येईल, एवढी जागा उपलब्ध आहे.

170

दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई मार्ग येथे असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यातील नुतनीकरण करण्यात आलेलया पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले. विशेष म्हणजे हे रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित २१ मजली स्वयंचलित सार्वजनिक वाहनतळामध्ये २४० वाहनांची क्षमता आहे. मुंबईतील हे पहिले रोबोटिक प्रणालीवर आधारीत महापालिकेचे वाहनतळ आहे.

वाहनतळामध्ये या आहेत सुविधा!

मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यक्षेत्रात असणा-या भुलाभाई देसाई मार्गालगत व सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराजवळ असणा-या हबटाऊन स्कायबे या इमारतीमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित वाहनतळ गुरुवारपासून मुंबईकरांच्या सेवेत खुले करण्यात आले. या २१ मजली वाहनतळामध्ये साधारणपणे २४० वाहने उभी करता येईल, एवढी जागा उपलब्ध आहे. या वाहनतळाला २ प्रवेशद्वारे असून २ बहिर्गमन द्वारे आहेत. या वाहनतळाची स्वयंचलित प्रचालन क्षमता ही दर तासाला ६० वाहनांचे प्रचालन करण्याइतकी आहे. हे वाहनतळ आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे वाहनतळ उभारण्यासाठी वापरण्यात आलेल्या सामुग्रींपैकी ८० टक्के सामुग्री भारतीय असून २० टक्के सामुग्री ही आयात केलेली आहे. तसेच या वाहनतळामध्ये स्वयंचलित पद्धतीने वाहनांची ने-आण करण्याकरीता २ मोठे उद्वाहक असून या व्यतिरिक्त २ शटल डिव्हाइस व २ सिलोमेट डॉली आहेत. तसेच कार वळविण्यासाठी ४ स्वयंचलित टर्न टेबलही या वाहनतळामध्ये आहेत. या स्वयंचलित सार्वजनिक वाहनतळाचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा, सी आणि डी विभागांच्या प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल यांच्यासह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड आणि मान्यवर उपस्थित होते.

New Project 4 16

(हेही वाचा : पावसाळी अधिवेशनही अध्यक्षाविना होणार?)

कशाप्रकारे होते गाडी पार्क!

एका बहुमजली वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर असणा-या एका भव्य पोलादी ‘प्लेट’ वर एक कार उभी केली जाते. कारची नोंद पार्किंगच्या प्रवेशद्वाराजवळ असणा-या रिसेप्शन काऊंटरवर संगणकीय पद्धतीने केली जाते. त्यानंतर ज्या पोलादी प्लेटवर कार उभी असते, ती प्लेट स्वयंचलित पद्धतीने कारसह वाहनतळामध्ये प्रवेश करते. यानंतर तब्बल २१ मजली वाहनतळामध्ये असणा-या भव्य लिफ्टमध्ये ती कार स्वयंचलित पद्धतीने सरकवली जाते. ज्यानंतर २१ मजल्यांपैकी ज्या मजल्यावर कार उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे, त्या मजल्यावरील पार्किंगच्या ठिकाणी लिफ्ट स्वयंचलित पद्धतीनेच जाऊन ‘कार’ पार्क केली जाते. याचप्रकारे पार्किंगमधून कार बाहेर काढताना देखील रोबोटिक व स्वयंचलित पद्धतीनेच ‘कार’ बाहेर पडते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.