BJP Candidate List : भाजपाच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला

187
BJP Candidate List : भाजपाच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला
BJP Candidate List : भाजपाच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला

आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Elections 2024) कार्यक्रम जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी असल्याने महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचाही प्रचारसभाचा जोर वाढत चालला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) यांची जागा वाटपाची बोलणी सुरू असतानाच काही पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. दारम्यान भाजपाच्या कोअर कमिटी (BJP Core committee) आणि निवडणूक समितीकडून लवकरच ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते. (BJP Candidate List)

(हेही वाचा – Shivadi Assembly Constituency : सुधीर साळवी यांना पक्षात घेण्याचे एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न)

मिळालेल्या माहितीनुसार, २३ आणि २४ सप्टेंबरला भाजपाच्या प्रमुख नेत्यांची मॅरेथॉन बैठक होईल. या बैठकीला भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विनोद तावडे (Vinod Tawde) आणि अन्य नेते उपस्थित असतील. या बैठकीमध्ये उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होईल आणि पितृपक्ष संपल्यानंतर ही यादी जाहीर केली जाणार आहे. (BJP Candidate List)

पहिल्या यादीला मुहूर्त कधी?

दरम्यान, पितृपक्ष संपल्यानंतर भाजपाची पहिली यादी येण्याची शक्यता आहे. घटस्थापना झाल्यानंतर म्हणजेच ३ ऑक्टोबरनंतर ही पहिली यादी जाहीर होऊ शकते. यात ५० उमेदवारांचा समावेश असण्याची चिन्हं आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.