- ऋजुता लुकतुके
तुम्हाला तातडीच्या खर्चासाठी पीएफमधून पैसे हवे असतील तर ईपीएफओच्या बदललेल्या नियमांची आधी माहिती करून घ्या. आता घरगुती कारणांसाठी तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून ५०,००० ऐवजी १ लाख रुपये एकावेळी काढून घेऊ शकणार आहात. श्रम व रोजगारमंत्री मनसुख मांडवीय यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याविषयीची घोषणा केली. १७ सप्टेंबरपासून हा नियम लागू झाल्याचं त्यांनी सांगितलं. (EPFO New Rule)
(हेही वाचा – Shivadi Assembly Constituency : सुधीर साळवी यांना पक्षात घेण्याचे एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा तुमच्या निवृत्तीनंतरच्या तरतुदीसाठी असतो. वर्षातून एकदा काही महत्वाच्या गरजांसाठी तुम्ही या फंडातून पैसे काढून घेऊ शकता. यापूर्वी ही मर्यादा ५० हजार रुपये इतकी होती. ती मर्यादा आता वाढवून १ लाख रुपये करण्यात आली आहे. इतकंच नाही तर यापूर्वी पीएफ खातं सुरू केल्यानंतर पहिलं एक वर्षं तुम्ही पैसे काढून घेऊ शकत नव्हता. तो नियम बदलूनही ही मर्यादा आता सहा महिन्यांवर आणण्यात आली आहे. (EPFO New Rule)
(हेही वाचा – Maharashtra Politics : उबाठा नेत्याची खासदारकी धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात)
पैसे काढून घेण्यासाठी काही कारणं ईपीएफओने मार्गदर्शक तत्त्व म्हणून नमूद केली आहेत. लग्नाचा खर्च, शिक्षण, अपंगत्वावर होणारा खर्च, बेरोजगारी, घर खरेदी किंवा नुतनीकरण तसंच आरोग्यविषयक खर्च यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढून घेऊ शकता. त्यासाठी ईपीएफओ कार्यालयातील एक फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागतो. यात युनिव्हर्जन अकाऊंट क्रमांक, ओळखपत्र, रद्द केलेला धनादेश आणि बँक खात्याचे तपशील अशी माहिती या फॉर्ममध्ये भरून द्यावी लागते. (EPFO New Rule)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community