Cleartrip कडून द बिग बिलियन डेज २०२४ सह ट्रॅव्‍हल सेलची घोषणा

यंदा सणासुदीच्‍या काळात ट्रॅव्‍हलला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासाठी जवळपास ५० एअरलाइन्‍स, १५ हजाराहून अधिक करारबद्ध हॉटेल सहयोगी आणि १०० हून अधिक बस ऑपरेटर्ससोबत सहयोग केला.

40
Cleartrip कडून द बिग बिलियन डेज २०२४ सह ट्रॅव्‍हल सेलची घोषणा

क्‍लीअरट्रिप (Cleartrip) या फ्लिपकार्ट कंपनीने २६ सप्‍टेंबर ते ६ ऑक्‍टोबर २०२४ पर्यंत द बिग बिलियन डेज (टीबीबीडी)सह बहुप्रतिक्षित इअर-एण्‍ड ट्रॅव्‍हल सेलची घोषणा केली आहे. यंदा, क्‍लीअरट्रिपचा सणासुदीच्‍या काळात भारतीयांच्‍या ट्रॅव्‍हल महत्त्वाकांक्षांमध्‍ये नवीन मानक स्‍थापित करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यासाठी फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बसेस् आणि हॉलिडे पॅकेजेसवर मोठ्या डिल्‍स देत आहे. यामुळे ग्राहक त्‍यांच्‍या दैनंदिन नित्‍यक्रमांमधून बाहेर पडत अत्‍यावश्‍यक गेटवेजचा आनंद घेऊ शकतील.

ग्राहक अनुभवांसोबत साहित्‍य खरेदीला अधिक प्राधान्‍य देत असताना ट्रॅव्‍हल सण साजरीकरणाचा मुलभूत भाग बनले आहे. टीबीबीडी या वाढत्‍या ट्रेण्‍डशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे, जे मूल्‍य-संचालित ट्रॅव्‍हल डिल्‍स देते, ज्‍यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वस्‍तूंची खरेदी करत सणासुदीच्‍या काळाचा उत्‍साहात आनंद घेता येतो. याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत क्‍लीअरट्रिपचे चीफ बिझनेस आणि ग्रोथ ऑफिसर अनुज राठी म्‍हणाले, ”आम्‍हाला भारतीय ग्राहकांच्‍या प्राधान्‍यक्रमांमध्‍ये बदल होताना दिसण्‍यात येत आहे आणि या परिवर्तनामध्‍ये ट्रॅव्‍हलला अधिक महत्त्व दिले जात आहे. क्‍लीअरट्रिपमध्‍ये (Cleartrip) आम्‍ही एकीकृत इकोसिस्‍टम डिझाइन करत ट्रॅव्‍हलचे लोकशाहीकरण करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहोत. ही एकीकृत इकोसिस्‍टम एअरलाइन्‍स, हॉटेल्‍स आणि प्रमुख ट्रॅव्‍हल सहयोगींना एकत्र कनेक्‍ट करते, ज्‍यामुळे आम्‍ही सर्वांसाठी एक-थांबा गंतव्‍य बनलो आहोत.”

ते पुढे म्‍हणाले, ”१२० दशलक्ष विश्रांतीसाठी प्रवास करणारे पर्यटक आणि २७ दशलक्ष आऊटबाऊंड पर्यटकांसह भारतातील आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी मागणी प्रबळपणे वाढत आहे. या वाढत्‍या मागणीला प्रतिसाद म्‍हणून क्‍लीअरट्रिपने (Cleartrip) लांबच्‍या पल्‍ल्‍याच्‍या गंतव्‍यांची विशेष श्रेणी डिझाइन केली आहे, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना लक्‍झरीसोबत प्रवासाचा अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍यास मदत होईल. एअरलाइन्‍स आणि हॉटेल चेन्‍ससोबतच्‍या धोरणात्‍मक सहयोगांच्‍या माध्‍यमातून आम्‍ही या क्‍यूरेटेड, उच्‍चस्‍तरीय अनुभवांना महत्त्वाकांक्षी करण्‍यासोबत उपलब्‍ध होण्‍याजोगे व किफायतशीर करतो.”

(हेही वाचा – Me Savarkar : स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘मी सावरकर’ या अभिनव वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन)

क्‍लीअरट्रिपने ग्राहकांना बुकिंग तारीख जवळ येत असताना किमतींमध्‍ये होणाऱ्या वाढीपासून वाचण्‍यास मदत करण्‍यासाठी टीबीबीडीकरिता या विशेष क्‍यूरेट केलेल्‍या ऑफिरिंग्‍ज सादर केल्‍या आहेत :

● २४९९ रूपयांपासून सुरू होणारे पंचतारांकित हॉटेल्‍स.
● हॉटेल्‍सवर किमान ४० टक्‍के सूट (फ्लॅश सेल – दररोज सायंकाळी ७ वाजता (रात्री ९ वाजेपर्यंत)).
● ५९९९ रूपयांपासून सुरू होणारे आंतरराष्‍ट्रीय गंतव्‍य.
● लंडन, ऑस्‍ट्रेलिया आणि म्‍युनिक अशा लांब पल्‍ल्‍याच्‍या गंतव्‍यांसाठी एअर इंडिया, ब्रिटीश एअरवेज, लुफ्थान्‍सा, एतिहाद इत्‍यादीकडून स्‍पेशल भाडे.
● ९९९ रूपयांपासून सुरू होणारे देशांतर्गत गंतव्‍य.
● चाइल्‍ड फ्लाइज फ्री – १२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्‍या १ मुलासोबत प्रवास करणारे कुटुंब या सेवेचा आनंद घेऊ शकतात (फ्लॅश सेल – मर्यादित कालावधीसाठी आणि उपलब्‍धतेनुसार).
● बाली, दुबई, मालदीव आणि थायलंड अशा गंतव्‍यांसाठी प्रतिव्‍यक्‍ती ९९९९ रूपयांपासून सुरू होणारे इंटरनॅशनल हॉलिडे पॅकेजेस्.
● बस बुकिंग्‍जवर जवळपास ३० टक्‍के सूट.
● फ्लिपकार्ट व मिंत्रा वापरकर्ते हॉटेल्‍सवर वरील इतर सूटव्‍यतिरिक्‍त जवळपास १५ टक्‍के अतिरिक्‍त सूटचा आनंद घेऊ शकतात; १ रूपयांमध्‍ये फ्लाइट्स कॅन्‍सलेशन सेवा आणि सुपरकॉइन्‍ससह जवळपास १५०० रूपयांची अतिरिक्‍त सूट रिडिम करू शकतात.

क्‍लीरिअट्रिपने (Cleartrip) ग्राहक-केंद्रित नाविन्‍यतांसह ट्रॅव्‍हलला नव्‍या उंचीवर घेऊन जाणे सुरू ठेवले आहे. कंपनीच्‍या नवीन ऑफरिंग्‍ज ‘क्‍लीअरट्रिप फॉर वर्क’ आणि ‘बस पास’ यामधून विशेष फायदे व अद्वितीय सोयीसुविधेसह प्रवास अधिक उत्‍साहित करण्‍याप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते. कंपनीने नुकतेच २०२३ मध्‍ये लाँच केल्‍यापासून बस श्रेणीमध्‍ये उल्‍लेखनीय १५० टक्‍के वाढीची नोंद केली.

(हेही वाचा – सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो; CM Eknath Shinde यांनी काढले गौरवोद्गार)

क्लीअरट्रिप बाबत

जुलै २००६ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेली फ्लिपकार्ट कंपनीच्या मालकीची क्लीअरट्रिप प्रा. लि. ही भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारी ऑनलाइन प्रवास तंत्रज्ञान कंपनी म्हणून उदयास आली आहे. एप्रिल २०२१ मध्ये फ्लिपकार्टने क्लीअरट्रिपचे बहुतांश समभाग खरेदी केले. व्‍हीआयडीईसीच्‍या नुकतेच संशोधनानुसार क्‍लीअरट्रिप (Cleartrip) दुसऱ्या क्रमांकाची ओटीए कंपनी म्‍हणून उदयास आली. उद्योगातील आघाडीचे नवप्रवर्तक म्हणून पुढे येण्याच्या आक्रमक योजनेसोबत क्लीअरट्रिप एंड-टू-एंड प्रवास उपाययोजनांच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी एक वेगळे मूल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्‍नशील आहे. क्‍लीअरचॉइस प्‍लस (ClearChoice Plus), क्‍लीअरचॉइस मॅक्‍स (ClearChoice Max) आणि कॅन्‍सल फॉर नो रीजन (Cancel for No Reason) अशा उद्योगातील सर्वप्रथम उत्पादनांसोबत क्लीअरट्रिपने ओटीए क्षेत्रात बदल घडवून आणण्याचे स्वप्‍न उराशी बाळगले आहे. ग्राहककेंद्री दृष्टीकोनातून विविध प्रकारच्या फ्लाइट्स, हॉटेल्स व बसेस अशी विविध उत्पादने एकत्र आणून क्लीअरट्रिप बाजारात एक खास स्थान निर्माण करते. ते आपल्या ग्राहकांना सुलभता, निवड, स्पर्धात्मक किमती आणि विशेष कन्‍टेन्‍ट या गोष्टी देते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.