काँग्रेस नेत्याविरोधात Shiv Sena महिला आघाडी आक्रमक

बाळासाहेब भवनाबाहेर जोडे मारो आंदोलन; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

146
काँग्रेस नेत्याविरोधात Shiv Sena महिला आघाडी आक्रमक
  • प्रतिनिधी

सत्तेत येताच, लाडकी बहीण योजना बंद करण्याचे विधान करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेत, नरिमन पॉंईंट येथील बाळासाहेब भवन कार्यालयासमोर गुरूवारी (१९ सप्टेंबर) जोरदार घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन केले. दरम्यान कॉंग्रेस कार्यालयावर मोर्चा नेणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Shiv Sena)

(हेही वाचा – Tirupati Prasadam : तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडूंसाठी जनावरांच्या चरबीचा वापर; मुख्यमंत्री चंद्राबाबूंचा माजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप)

महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवत आहे. या योजनेची राज्यभरात सर्वत्र चर्चा सुरू असून, चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतांसाठी ही योजना आणली आहे. मात्र, आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास ही योजना बंद करू, असे विधान माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी केले होते. केदार यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. महायुतीमधील तिन्ही पक्षाकडून काँग्रेस आणि केदार यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. गुरुवारी शिवसेनेच्या महिला आघाडीने जोडे मारो आंदोलन केले. दरम्यान, बाळासाहेब भवन ते काँग्रेस कार्यालयापर्यंत आंदोलन जात असताना, मध्येच पोलिसांनी आंदोलन थांबवत आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. माजी आमदार मनीषा कायंदे, आमदार यामिनी जाधव, प्रवक्त्या शितल म्हात्रे आदी आघाडीतील अनेक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. (Shiv Sena)

(हेही वाचा – Maharashtra च्या राजकारणात महिला मुख्यमंत्री होण्याची मागणी या निवडणुकीत होणार पूर्ण?)

महिला विरोधी काँग्रेसची भूमिका

काँग्रेसची भूमिका नेहमीच महिला विरोधी राहिली आहे. राहुल गांधी हे परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करत आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका करत असून बंद करण्याची भाषा करत आहेत. परंतु, महिलांदृष्टीने ही योजना खूप महत्त्वाची आहे. दीड हजारांत अनेक महिलांना संसारात आर्थिक मदत होत आहे. कॉंगेस नेत्यांच्या या विधानांचा तीव्र शब्दात याचा निषेध करते, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या, माजी आमदार मनीषा कायंदे यांनी दिली. (Shiv Sena)

(हेही वाचा – सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो; CM Eknath Shinde यांनी काढले गौरवोद्गार)

घोषणाबाजीने परिसर दणाणला

आंदोलनकर्त्यांनी केदार यांचे मोठे पोस्टर हाती घेत त्यांना जोडो मारो आंदोलन केले. मिळून साऱ्या बहिणी… काँग्रेसला बाजू पाणी, लाडक्या बहिणींचे केदारला पोटदुखी, बँक घोटाळ्याचा आरोपी सुनील केदार मुर्दाबाद… केदारचे करायचे काय खाली डोक वर पाय… अशा घोषणाबाजी देत, परिसर दणाणून सोडला. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा यावेळी तैनात होता. (Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.