निवडणुकांच्या तोंडावर Shiv Sena पदाधिकाऱ्यांना लॉटरी; ‘या’ सदस्यांची नियुक्ती

200
निवडणुकांच्या तोंडावर Shiv Sena पदाधिकाऱ्यांना लॉटरी; 'या' सदस्यांची नियुक्ती
  • प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या (Shiv Sena) नाराज पदाधिकाऱ्यांची महामंडळ, विविध समित्यांवर वर्णी लावण्याचा धडाका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सुरू केला आहे. विधीमंडळ अथवा संसदीय सदस्यातून मिलिंद देवरा, सदा सरवणकर यांची नामनिर्देशित सदस्य तर मनिषा कायंदे, श्रीराम रावराणे आदींची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली आहे. नियोजन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी (१९ सप्टेंबर) जारी केला.

(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या प्रारुप जाहिरात धोरणात भोसले समितीलाही करायच्या काही सूचना?)

लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र, विधानसभेला नाराज आमदारांकडून दगाफटका होऊ नये, यासाठी महामंडळे, विविध समित्या देण्यात येणार आहे. नुकतेच हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्ष पदी तर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली. (Shiv Sena)

(हेही वाचा – BMC Budget : आमदार, खासदार यांना यंदा प्रत्येकी १५ कोटींचा विकासनिधी?)

आता जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ व संसद सदस्यांतून नाम निर्देशनाच्या २ सदस्यांची, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले ४ नामनिर्देशित सदस्य तसेच सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या व जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या ६ व्यक्तींची विशेष निमंत्रित म्हणून मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती केली आहे. मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रितांचे नामनिर्देशन पुढील आदेश होईपर्यंत किंवा शासनाकडून सदर नामनिर्देशन रद्द होईपर्यंत अबाधित राहतील, असे निर्णयात नमूद केले आहे. (Shiv Sena)

(हेही वाचा – Assembly Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं; ‘इतक्या’ जागांवर दावा)

विधीमंडळ अथवा संसदीय सदस्यातून नियुक्ती

नामनिर्देशीत सदस्य
मिलिंद देवरा, सदा सरवणकर

जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाची माहिती

मनिषा कायंदे, श्रीराम रावराणे, गोपाळ दळवी, मीना कांबळी

जिल्हा नियोजन समितीचा अनुभव विशेष निमंत्रित

दत्ता नरवणकर, सिद्धार्थ कासारे, सिद्धार्थ गमरे, शलका साळवी, सतीश तिवारी, जितेंद्र सोनावणे

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.