Special Train : दिवाळी निमित्त नांदेडहून मुंबई-पुण्याला विशेष रेल्वे

138
Special Train : दिवाळी निमित्त नांदेडहून मुंबई-पुण्याला विशेष रेल्वे

मराठवाड्यातून सध्या मुंबईसाठी नांदेडवरून दैनंदिन पाच तर, पुण्यासाठी दैनंदिन दोन रेल्वे आहेत. दीपावलीनिमित्त प्रथमच करिमनगर-पुणे, नांदेड-पनवेल व करिमनगर-मुंबई या तीन रेल्वे मनमाडमार्गी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडून तसे पत्रक काढण्यात आले आहेत. (Special Train)

(हेही वाचा – ‘ते आपल्या देवी-देवतांना देव मानत नाहीत…’, पंतप्रधान Narendra Modi यांचा राहुल गांधींवर घणाघात)

पुणे-करिमनगर-पुणे (०१४५१/५२) ही साप्ताहिक रेल्वे आहे. पुणे-करिमनगर ही रेल्वे ता. २१ ,२८ ऑक्टोबर, ४ व ११ नोव्हेंबरला पुणे येथून रात्री १०.४५ वाजता निघेल तर, करिमनगर येथे तिसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजता पोहचेल. परतीच्या काळात करिमनगर-पुणे ही रेल्वे ता. २३, ३० ऑक्टोबर आणि ता. ६, १३ नोव्हेंबरला करिमनगर येथून निघून पुणे येथे दुसऱ्या सकाळी ९.४५ वाजता पोहचेल. या रेल्वेच्या प्रत्येकी चार फेऱ्या होणार आहेत. तसेच नांदेड-पनवेल (०७६२५/२६) ही रेल्वे परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक मार्गे धावणार आहे. (Special Train)

(हेही वाचा – राहुल गांधी कॉंग्रेसचा ‘फुसका बार’; J. P. Nadda यांनी पत्र लिहून साधला जोरदार निशाणा)

नांदेड-पनवेल विशेष रेल्वे (०७६२५) ही २१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत सोमवार व बुधवार अशी धावेल. नांदेड स्थानकावरून रात्री ११ वाजता निघून पनवेल येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.३५ वाजता पोहोचेल. तर, परतीच्या काळात पनवेल-नांदेड (०७६२६) ही रेल्वे २२ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत मंगळवार, गुरुवार धावेल. पनवेल स्थानकावरून दुपारी २.३० वाजता निघून नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी नांदेडला साडेचार वाजता पोचेल. या रेल्वेच्या प्रत्येकी १२ फेऱ्या होणार आहेत. (Special Train)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.