नवी मुंबईत सामान्य नागरिकांचे आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्नं पूर्ण होणार आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सिडको बंपर लॉटरी (CIDCO Bumper Lottery) काढणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे स्वप्नं पूर्ण होण्यास आता मदत होणार आहे. या लॉटरीत तब्बल ४० हजार घरे आहेत. (CIDCO Lottery 2024)
मुंबई, नवी-मुंबईत खासगी घरांच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना घर घेणं शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण लॉटरीची वाट पाहत असतात. दसऱ्याला सिडको तब्बल ४० हजार घरांच्या लॉटरीची सोडत जाहीर करणार आहे. ही घरे रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये असणार आहेत. त्यामुळे मुंबई व मुंबई उपनगरांत राहणाऱ्यांना आता परवडणारी घरे लवकरच उपलब्ध होणार आहेत. (CIDCO House Lottery 2024)
(हेही वाचा – राज्याच्या राजधानीतून Sharad Pawar गट होणार हद्दपार?)
या भागात सिडकोची लॉटरी निघणार
सिडकोद्वारे काढण्यात येणारी ही घरे वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर, नेरूळ या मोक्याच्या ठिकाणी आहेत. सध्या सिडको ६७ हजार घरांचे बांधकाम करत आहे. यातील ४० हजार (cidco 40 thousand home) घरे ही पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ही लॉटरी काढली जाणार आहे. ही घरे नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होणार आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community