लेबनॉनमधील (Lebanon) हिजबुल्लाहच्या विरोधात इस्रायल सातत्याने हल्ले करत आहे. पेजर आणि रेडिओ-वॉकी टॉकीजचा स्फोट केल्यानंतर इस्त्रायली सैन्याने गुरुवारी दक्षिण लेबनॉनमध्ये बॉम्बफेक केली. या हल्ल्यानंतर इस्रायलने इराण समर्थित हत्येचा कट हाणून पाडल्याचा दावा केला आहे. मात्र, या हल्ल्यात किती लोक जखमी झाले आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. हिजबुल्लाहच्या (Hezbollah) सैनिकांनी दळणवळणासाठी वापरल्या जाणाऱ्या रेडिओ आणि वॉकी टॉकीमध्ये झालेल्या स्फोटानंतर इस्रायलने हा हल्ला केला. त्यामुळे इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. (Israel-Hezbollah War)
इस्रायलने सर्व मर्यादा ओलांडल्या: हिजबुल्ला प्रमुख
पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटानंतर, हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाह (Hezbollah chief Hassan Nasrallah) यांनी स्फोटात मारल्या गेलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला. नसराल्लाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, इस्रायलने पेजरचा स्फोट (Pager blast) करून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, ज्यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. हा हल्ला म्हणजे इस्रायलकडून लेबनॉनविरुद्धची युद्धाची घोषणा आहे. (Israel-Hezbollah War)
(हेही वाचा – निवडणुकांच्या तोंडावर Shiv Sena पदाधिकाऱ्यांना लॉटरी; ‘या’ सदस्यांची नियुक्ती)
हे हल्ले युद्ध गुन्हे मानले जाऊ शकतात…
हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाह यांनी एका दूरचित्रवाणी भाषणात म्हटले आहे की आम्हाला मोठ्या लष्करी हल्ल्याचा सामना करावा लागत आहे यात शंका नाही. अशा प्रकारची हत्या, टार्गेटिंग आणि गुन्हे जगात स्वीकारले जाऊ शकत नाहीत. ते म्हणाले की, हल्ल्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
हेही पाहा –