Tirupati Balaji Prasad : तिरुपती मंदिरातील प्रसादामध्ये जनावरांच्या चरबीचा वापर झाला होता का? प्रयोगशाळेतील रिपोर्टमधून सत्य उघड

358
Tirupati Balaji Prasad : तिरुपती मंदिरातील प्रसादामध्ये जनावरांच्या चरबीचा वापर झाला होता का? प्रयोगशाळेतील रिपोर्टमधून सत्य उघड
Tirupati Balaji Prasad : तिरुपती मंदिरातील प्रसादामध्ये जनावरांच्या चरबीचा वापर झाला होता का? प्रयोगशाळेतील रिपोर्टमधून सत्य उघड

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या (Tirupati Balaji Prasad) लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर झाल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकरणात माजी मुख्यमंत्री जगनमोहन यांच्या सरकारवर आरोप केले होते. रेड्डी यांनी हे आरोप फेटाळले होते. त्यानंतर आंध्र प्रदेशातील सत्तारुढ तेलुगु देसम पक्षानं याबाबतचा CALF प्रयोगशाळेचा अहवाल सार्वजनिक केला आहे. या अहवालामध्ये तिरुपती बालाजीच्या मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपामध्ये प्राण्यांची चरबी आढळली आहे.

(हेही वाचा-Assembly Elections 2024 : उबाठा गटाने कॉंग्रेसला बजावले, म्हणाले येत्या विधानसभेत आम्ही… )

CALF प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, तुपामध्ये फिश ऑयल, बीफ टॅलो आणि काही प्रमाणात डुकराची चरबी आढळली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी बुधवारी यापूर्वीच्या जगनमोहन रेड्डी सरकारवर तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा दावा केला होता. YSR सरकारनं मागील पाच वर्षांमध्ये तिरुमाला मंदिराचं पावित्र्य धुळीस मिळवलंय, असा दावा नायडू यांनी केला होता. त्यांनी अन्नदानमच्या (मोफत भोजन) गुणवत्तेमध्ये तडजोड केली. त्याचबरोबर तिरुमालामधील पवित्र लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला होता, असं नायडू म्हणाले होते. (Tirupati Balaji Prasad)

(हेही वाचा-Indian Wedding : भारतात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार ३५ लाख लग्न, ४.२५ कोटी रुपयांचा खर्च)

‘आम्ही आता तिरुमला लाडूच्या प्रसादासाठी शुद्ध तुपाचा वापर करत आहोत. TDP सरकार तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या (TTD) पावित्र्याच्या संरक्षणासाठी कठोर मेहनत करत आहेत,’ असा दावा नायडू यांनी केला आहे. (Tirupati Balaji Prasad)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.