Crime : भारतीय नागरिक बनून बेकायदेशीर रशियात गेलेल्या बांगलादेशी नागरीकाला अटक

36
Crime : भारतीय नागरिक बनून बेकायदेशीर रशियात गेलेल्या बांगलादेशी नागरीकाला अटक
Crime : भारतीय नागरिक बनून बेकायदेशीर रशियात गेलेल्या बांगलादेशी नागरीकाला अटक

भारतीय असल्याचे बोगस कागदपत्रे तयार करून रशियात नोकरीसाठी गेलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला रशियातून भारतात हद्दपार करण्यात आले आहे, मुंबई पोलिसांनी या बांगलादेशी नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करून त्याच्याविरुद्ध फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद बप्पी दास नारायण चंद्र दास, (३९) असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद बप्पी (Mohammed Bappi) हा भारतीय कागदपत्राच्या आधारे रशिया देशात नोकरीसाठी गेला होता, मात्र रशियात येण्यासाठी त्याच्याकडे कुठलेही पुरावे नव्हते किंवा हॉटेल बुकिंग केल्याची कुठेही नोंद नव्हती, रशियामध्ये येण्यामागे त्याचा नेमका हेतू काय आहे? हे रशियन पोलिसांना स्पष्ट होत नसल्यामुळे त्याला रशियातून पुन्हा भारतात हद्दपार करण्यात आले होते. मोहम्मद बप्पी (Mohammed Bappi) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचला असता त्याला इमिग्रेशन अधिकारी यांनी ताब्यात घेऊन भारतीय अधिकाऱ्यांनी त्याच्या हद्दपारीच्या संदर्भात त्याची चौकशी केली आणि त्याच्या बोलीभाषेतून तो भारतीय नागरिक नसल्याचे आढळून आले. (Crime)

(हेही वाचा – Teachers Exam : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ होणार ‘या’ तारखेला)

सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमिग्रेशन अधिकारी, अजय कुमार विमानतळावर ड्युटीवर असताना एका प्रवाशाला त्याच्याकडे आणण्यात आले आणि त्याला रशियातून हद्दपार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. “लो प्रोफाईल आणि हॉटेल बुकिंग नसल्याचा हवाला देत रशियन इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी या माणसाला हद्दपार केले. जेव्हा भारतीय अधिकाऱ्यांनी त्याला त्याच्या बोलीभाषेतून रशियातून का हद्दपार करण्यात आले असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना कळले की तो बांगलादेशी नागरिक असून त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट होते, शेवटी जेव्हा अधिकाऱ्याने त्याच्याकडे कसून चौकशी केली तेव्हा त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले. मोहम्मद बप्पी दास नारायण चंद्र दास, (३९) तो बांगलादेशातील नोआखली येथील राहाणारा आहे. “आम्ही त्याच्या कुटुंबातील सदस्यांना व्हॉट्सॲप कॉलद्वारे त्याची मूळ कागदपत्रे मागवायला सांगितले आणि त्यावरून तो बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत त्याने सांगितले की, त्याने कोलकाता येथील एका एजंटकडून त्याने बनावट पासपोर्ट बनवला आहे. कागदपत्रे आणि नंतर टुरिस्ट व्हिसावर कामासाठी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला आणि नंतर तो बेकायदेशीरपणे थांबला होता. तथापि, रशियन अधिकाऱ्यांनी त्याला परत पाठवले,” अशी माहिती पोलिस अधिकारी यांनी दिली. (Crime)

मोहम्मद बप्पी (Mohammed Bappi) हा ११ सप्टेंबर रोजी भारतीय पासपोर्टवर बेकायदेशीरपणे रशियाला गेला होता. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अनव्ये बनावट दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि अस्सल म्हणून वापरणे, फसवणूक आणि परदेशी कायदा, 1946 आणि पासपोर्ट कायदा, 1967 च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती सहार पोलिसांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.