एसटीच्या निवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांना लवकरच मिळणार थकीत देणी!

जून २०१८ पासून राज्यभरातील तब्बल ७ हजार ६०० निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पैसे अद्यापही महामंडळाकडून मिळालेले नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे २०० कोटी रुपयांची देणी थकीत अाहेत.

115

एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जातात. मात्र, जून २०१८ पासून राज्यभरातील तब्बल ७ हजार ६०० निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना ही रक्कम अद्यापही महामंडळाकडून मिळालेली नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे २०० कोटी रुपये देणे थकीत असून अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात गेल्या चार वर्षांपासून चकरा मारत आहेत. ही रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही. त्यामुळे या संदर्भात आज महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रसच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी सदरची थकीत देणी लवकरात लवकर देऊ. या संदर्भात निवृत्त कर्मचाऱ्यांसोबत लवकरच एक बैठक घेऊन थकीत देण्यासह इतरही प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन सुद्धा देण्यात आले.

अद्यापपर्यंत महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाहीत!

संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाच्या साडे साथ हजार निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. मात्र, अद्यापपर्यंत महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाहीत. गेल्या चार वर्षात ८० पेक्षा जास्त निवृत्त कामगारांचा मृत्यूही झाल्याची माहिती समोर आली आहे. संतापाची लाट-एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून लगेच दिले जातात. मात्र, जून २०१८ पासून राज्यभरातील तब्बल ७ हजार ६०० निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पैसे अद्यापही महामंडळाकडून मिळालेले नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे २०० कोटी रुपयांची देणी थकीत बाकी अाहे. अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या कार्यालयात गेल्या चार वर्षांपासून चकरा मारत आहेत.

कोरोना आजार उपचारासाठी पैशाची चणचण!

सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांपैकी, अंदाजे ८० कर्मचारी व अधिकारी मृत्यू पावल्याची माहिती समोर आली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. निवृत्तीनंतरची सर्व देणी तात्काळ देण्याचे परिपत्रक असताना महामंडळात निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांची थकीत देणी मिळालेली नाहीत, हे अन्यायकारक असून मुळात इतरांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना निवृत्तीनंतरची रक्कम सुद्धा कमी मिळते. त्यातही सदर रक्कम थकीत राहिल्याने निवृत्त कर्मचारी व अधिकारी संकटात सापडले आहेत. यातील काही कर्मचाऱ्याना कोरोना प्रादुर्भाव झाल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्यांना औषध उपचारासाठी सुद्धा रक्कम कामी आलेली नाही.

परिवहन राज्यमंत्री यांना निवेदन

आशिया खंडातील सर्वाधिक मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थामध्ये एसटी महामंडळ गणले जाते. तरीही २०१८ पासून ७ हजार ६०० कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरक मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्व निवृत्त कामगारांना व अधिकाऱ्यांना निवृत्तीचे थकीत पैसे व्याजासह मिळण्यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा, अशी मागणीही या वेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या वेळी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत काकडे, कार्याध्यक्ष डी.ए. लीपणे- पाटील हे हजर होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.