Ganesh Visarjan 2024 : कृत्रिम तलावांतील विसर्जनाला अजुनही नाही भाविकांची पसंती, यंदा केवळ ८२ हजार मूर्तींचे झाले विसर्जन

198
Ganesh Visarjan 2024 : कृत्रिम तलावांतील विसर्जनाला अजुनही नाही भाविकांची पसंती, यंदा केवळ ८२ हजार मूर्तींचे झाले विसर्जन
Ganesh Visarjan 2024 : कृत्रिम तलावांतील विसर्जनाला अजुनही नाही भाविकांची पसंती, यंदा केवळ ८२ हजार मूर्तींचे झाले विसर्जन
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबईत यंदा पर्यावरणपुरक गणपती बाप्पांचे विसर्जन पार पडले जावे यासाठी यंदा महापालिकेच्यावतीने तब्बल २०४ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली. यासर्व कृत्रिम तलावांमध्ये मागील दहा दिवसांमध्ये एकूण ८२ हजार ००५ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. तर मागील वर्षी १९८ कृत्रिम तलावांत ७२ हजार २४० मूर्तींचे विसर्जन पार पडले होते. मागील वर्षीच्या तुलनेत कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यात आलेल्या गणेश मूर्तींच्या संख्येत तब्बल सुमारे १० हजारांनी वाढ झाली असून त्या आधीच्या वर्षांत ८ हजार ४३६ मूर्तींने वाढ झाली होती. त्यामुळे यंदा कृत्रिम तलावांतील २५७४ गौरी आणि हरतालिका वगळता यंदाही विसर्जित गणेशमूर्तीची संख्या ८ हजारांनी वाढल्याचे दिसून येते. (Ganesh Visarjan 2024)

गणेशोत्सवात बाप्पांचे आगमन झाल्यापासून दीड दिवसांपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्यावतीने ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी व्यवस्था उपलब्ध करून करून दिली होती. या सर्व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी मागील दहा दिवसांमध्ये घरगुती आणि सार्वजनिक अशाप्रकारे एकूण ८२ हजार ००५ गौरी आणि गणपतींचे विसर्जन पार पडले. यात सार्वजनिक १५५७ आणि ७७ हजार ८७४ घरगुती तसेच हरतालिका व गौरी २५७४ आदींचा समावेश आहे. (Ganesh Visarjan 2024)

(हेही वाचा – Special Train : दिवाळी निमित्त नांदेडहून मुंबई-पुण्याला विशेष रेल्वे)

तर मागील वर्षी एकूण १९८ ठिकाणी कृत्रिम तलाव बांधले होते. त्यात एकूण ७६ हजार ७०८ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले होते. त्यात सार्वजनिक १९०४ आणि ७२ हजार २४० घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन पार पडले होते.

तर त्या अधीच्य वर्षी म्हणजे सन २०२२च्या गणेशोत्सवात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती तसेच सार्वजनिक अशाप्रकारे एकूण ६३ हजार ८०७ गणेश मूर्तींचे तर सन २०२१च्या गणेशोत्सवामध्ये ७५ हजार ८९० गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते.

सन २०२३ मध्ये महापालिकेने प्रथम १९१ आणि गौरी गणपतीनंतर कृत्रिम तलावांची संख्या वाढवून १९८ एवढी केली होती. तर त्या आधीच्या म्हणजे २०२२ मध्ये १६२ कृत्रिम तलावांची सुविधा देण्यात आली होती. सन २०२१मध्ये १७३ कृत्रिम तलावे उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे १६२ कृत्रिम तलाव असताना ६३ हजार ८०७ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले होते, तिथे १९८ कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर केवळ ७२ हजार २४० मूर्तींचे विसर्जन झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ०८ हजार ४३६ ने वाढले होते. तर यंदा मागील वर्षाच्या तुलनेत कृत्रिम तलावांची संख्या १९८ च्या तुलनेत वाढवून २०४ केली होती. त्यात गौरी/हरतारिका वगळता ७७,८७४ घरगुती आणि १५५७ सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. (Ganesh Visarjan 2024)

(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्तींची संख्या १३२ ने घटली, घरगुती गणपतींची संख्या ५ हजारांनी वाढली)

कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन झालेल्या सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तीची आकडेवारी

सन २०२४:
एकूण विसर्जन ७९,५०० ( घरगुती: ७७,८७४ सार्वजनिक : १५५७)

सन २०२३ :
एकूण विसर्जन : ७४, १४४( घरगुती : ७२,२४०, सार्वजनिक : १९०४)

सन २०२२ :
एकूण विसर्जन : ६३, ८०४( घरगुती :६१९८५, सार्वजनिक :१८२२)

सन २०२१ :
एकूण विसर्जन: ७५,८९०( घरगुती:७२३८८, सार्वजनिक :३५०२)

सन २०२० :
एकूण विसर्जन : ६८,११९ ( घरगुती : ६४३८६, सार्वजनिक :३७३३)

सन २०१९ :
एकूण विसर्जन : ३३,२१७ ( घरगुती : ३२,६२९, सार्वजनिक :५८८)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.