शनिवारपासून Coastal Road सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंतच राहणार खुला

1235
Coastal Road वरील मालाड चारकोपमधील जुळ्या बोगद्यासाठीचा सल्ला १६४ कोटींचा
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेमार्फत धर्मवीर, स्‍वराज्‍यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्‍ता (दक्षिण) प्रकल्‍प हा शामलदास गांधी मार्ग (प्रिन्‍सेस स्‍ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतूच्‍या वरळी टोकापर्यंत बांधण्‍यात येत आहे. आजपर्यंत या प्रकल्‍पाचे ९२ टक्‍के काम पूर्ण झाले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

गणेशोत्‍सवादरम्‍यान मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍प हा ०६ सप्‍टेंबर २०२४ ते १८ सप्‍टेंबर २०२४ या कालावधीत २४ तास वाहतुकीसाठी खुला होता. आता, शनिवारी २१ सप्‍टेंबर २०२४ पासून मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍प वाहतुकीसाठी आठवड्यातील सातही दिवस सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर, रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : दहशतवाद्यांच्या गळ्यात गळे घालणारे खरे देशद्रोही, मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका)

दक्षिणवाहिनी बिंदूमाधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक (लोटस जंक्‍शन) आणि अमरसन्‍स उद्यान ते मरीन ड्राईव्‍ह ही मार्गिका तसेच, उत्‍तरवाहिनी मरीन ड्राईव्‍ह, हाजी अली आणि रजनी पटेल चौक (लोटस जंक्‍शन) ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंतची (राजीव गांधी सागरी सेतू) मार्गिका वाहतुकीसाठी खुली राहणार आहे. (Coastal Road)

दरम्‍यान, धर्मवीर, स्‍वराज्‍यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍पाचे (दक्षिण) उर्वरित कामकाज वेगाने सुरू आहे. वाहनचालकांनी वेगमर्यादा, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वाहतूक शिस्‍त पाळावी. वाहने चालविताना अधिकची काळजी घ्‍यावी. अपघात टाळावेत आणि महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. (Coastal Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.