Congress ने गणपतीला तुरुंगात टाकलं तेव्हा तुम्ही गप्प का? PM Narendra Modi यांचा ठाकरेंना सवाल

173
Congress ने गणपतीला तुरुंगात टाकलं तेव्हा तुम्ही गप्प का? PM Narendra Modi यांचा ठाकरेंना सवाल
Congress ने गणपतीला तुरुंगात टाकलं तेव्हा तुम्ही गप्प का? PM Narendra Modi यांचा ठाकरेंना सवाल

पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) आज महाराष्ट्रात आहेत. वर्ध्यात हा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi ) उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. गणपती, टुकडे टुकडे गँग आणि ओबीसींच्या प्रश्नावरून मोदींनी (PM Narendra Modi ) विरोधकांवर टीका केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता त्यांनी निशाणा साधला. त्यांनी काँग्रेससोबतच (Congress) मित्रपक्षांना पण चांगलेच सुनावले.

(हेही वाचा-Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनल हॅक!)

कर्नाटक प्रकरणावरुन बोलताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi ) म्हणाले, “देशातील भ्रष्ट परिवार गांधी परिवार आहे. गणपती पूजेला आजच्या काँग्रेसचा (Congress) विरोध आहे. मी गणपती पुजेला गेलो तर काँग्रेसचं तुष्टीकरण भूत जागं झालं. कर्नाटक मध्ये गणपतीला पोलीस व्हॅन मध्ये कैद केलं. महाराष्ट्रात गणपती पूजा करत असताना गणपती पोलीस व्हॅनमध्ये होता. काँग्रेसच्या सहकाऱ्यांवर असा रंग चढला की त्यांनी गणपती पोलिस व्हॅनमध्ये होता याचा विरोध केला नाही.” अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी ठाकरेंवर निशाणा साधला.

काँग्रेसमध्ये द्वेषाचं भूत आहे

पुधे बोलताना ते (PM Narendra Modi ) म्हणाले की, “आम्ही अनेक निर्णय घेतले. पण मध्ये एक सरकार आलं आणि त्यांनी सर्व थांबवलं. ज्या काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या मित्रांनी शेतकऱ्यांना बर्बाद केलं. त्यांना परत संधी द्यायची नाही. काँग्रेसचा (Congress) एकच हेतू आहे, खोटं, फसवणूक आणि बेईमानी आहे. काँग्रेसने तेलंगणात कर्जमाफीची घोषणा केली. त्यांचं सरकार आलं. पण त्यांनी कर्जमाफ केलं नाही. महाराष्ट्रात आपल्याला त्यांच्या धोकेबाजीपासून सावध राहिलं पाहिजे. आज जी काँग्रेस आहे, ती गांधींची नाही. आजच्या काँग्रेसमध्ये देशभक्तीची आत्मा मेली आहे. आजच्या काँग्रेसमध्ये द्वेषाचं भूत आहे.”

काँग्रेसला गणपती पूजेचीही चीड आहे

“आज काँग्रेसच्य़ा (Congress) लोकांची भाषा पाहा. परदेशात जाऊन त्यांचे देशविरोधी अजेंडे सुरू आहेत. समाजाला तोडणं, देशात फूट पाडण्यावर बोलत असतात. तुकडे तुकडे गँग आणि अर्बन नक्षली लोक काँग्रेस चालवत आहे. देशातील सर्वात भ्रष्ट आणि बेईमान पार्टी काँग्रेस आहे. देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब हे काँग्रेसचं शाही कुटुंब आहे.लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात गणेशोत्सव सुरू झाला. सर्व धर्मीय एकसाथ येत होते. काँग्रेसला गणपती पूजेचीही चीड आहे. मी गणेश पूजेला गेलो तर काँग्रेसचं तुष्टीकरण सुरू झालं. काँग्रेसने गणपती पूजेला विरोध केला. तुष्टीकरणासाठी काँग्रेस काहीही करत आहे.” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला सुनावलं. (PM Narendra Modi )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.