Tirupati Laddu Prasadam : हिंदूंच्या मंदिरांतील प्रसादामध्ये होणाऱ्या भेसळीच्या विरोधात Ranjit Savarkar यांनी दोन महिन्यांपूर्वीच उघडली मोहीम

आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाचे (Tirupati Laddu Prasadam) पावित्र्य आणि शुद्धतेबाबतचा वाद पेटला आहे. तेलुगू देसम पक्षा (टीडीपी) च्या दाव्यानुसार, वायएसआरसी सरकारच्या कार्यकाळात तिरुमाला मंदिर ट्रस्टला प्रसिद्ध तिरुपती लाडू प्रसादम बनवण्यासाठी पुरवण्यात आलेल्या तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासले असता त्यात प्राण्यांची चरबी आणि माशांच्या तेलाचा समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

199

हिंदूंच्या मंदिरांच्या बाहेर विक्री होणारे लाडू, पेढे देवाच्या चरणी अर्पण केल्यावर ते प्रसाद म्हणून वाटले जातात. मात्र या प्रसादामध्ये भेसळ होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळेच हिंदूंच्या मंदिरांमध्ये अर्पण केले जाणारे पूजा साहित्य आणि प्रसाद यांचे पावित्र्य टिकून रहावे, त्यांची शुद्धता जपली जावी, यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी दोन महिन्यांपूर्वी ‘ओम प्रतिष्ठान’ची स्थापना केली, त्यावेळी मंदिरांच्या बाहेर विक्रेत्यांना ‘ओम प्रमाणपत्र’ वितरित करण्यास सुरुवात केली. याविषयाची गांभीर्य वेळीच लक्षात घेणे अपेक्षित होते, कारण आता जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडू प्रसादात (Tirupati Laddu Prasadam) प्राण्यांची चरबी आणि माशाचे तेल सापडले. यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामळे ‘ओम प्रमाणपत्रा’च्या चळवळीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

तिरुपती बालाजीच्या प्रसादात भेसळ 

आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाचे (Tirupati Laddu Prasadam) पावित्र्य आणि शुद्धतेबाबतचा वाद पेटला आहे. तेलुगू देसम पक्षा (टीडीपी) च्या दाव्यानुसार, वायएसआरसी सरकारच्या कार्यकाळात तिरुमाला मंदिर ट्रस्टला प्रसिद्ध तिरुपती लाडू प्रसादम बनवण्यासाठी पुरवण्यात आलेल्या तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासले असता त्यात प्राण्यांची चरबी आणि माशांच्या तेलाचा समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सत्ताधारी तेलुगु देसम पक्षाने दावा केला आहे की, गुजरातमधील एका प्रयोगशाळेत या तुपाचे नमुने तपासण्यात आले. टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमणा रेड्डी यांनी 19 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत प्रयोगशाळेचा अहवाल सार्वजनिक केला. त्यांनी सांगितले की, हे नमुने  गुजरातस्थित पशुधन प्रयोगशाळा, NDDB (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) आणि  CALF (सेंटर फॉर ॲनालिसिस अँड लर्निंग इन लाइव्हस्टॉक अँड फूड) यांना 9 जुलै 2024 रोजी पाठवण्यात आले होते. १७ जुलै रोजी हे अहवाल प्राप्त झाले होते.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा हा प्रकार तात्काळ थांबवण्यासाठी ‘ओम् प्रमाणपत्रा’ची संकल्पना मांडण्यात आली. ‘ओम प्रमाणपत्र’ हे प्रसाद शुद्धतेची हमी असेल. मंदिराबाहेरील मिठाई विक्रेत्यांकडील पदार्थांची तपासणी करून ते शुद्ध असल्याचे खात्री झाल्यावर त्या दुकानदारांना हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ज्यामुळे हिंदूंना आता मंदिराबाहेर पूजा साहित्य खरेदी करताना कुणाकडे शुद्ध पूजा साहित्य आणि प्रसाद आहे, हे या प्रमाणपत्रामुळे पटकन लक्षात येत आहे. दोन महिन्यात ही चळवळ वेग घेत आहे. आता तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादामधील (Tirupati Laddu Prasadam) भेसळ समोर आल्यामुळे या मोहिमेला राष्ट्रीय स्वरूप आणण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

– रणजित सावरकर, अध्यक्ष, ओम प्रतिष्ठान 

दोन महिन्यांपूर्वीच केलेले सजग 

सध्या हिंदूंच्या मंदिराबाहेर मोठ्या संख्येने मिठाई विक्रेत्यांची दुकाने असतात. त्यातील अनेक जण अन्य धर्मीय असतात. त्यांच्याकडून प्रसादाच्या निर्मितीमध्ये भेसळ केली जाते. अनेकदा त्यामध्ये गायीच्या चरबी वापरून करून बनवलेल्या भेसळयुक्त तुपाचा वापर केला जातो, अशा घटना उघडकीस आल्या आहेत. ही भेसळ रोखण्यासाठी आणि हिंदूंच्या मंदिरातील प्रसादाचे पावित्र्य आणि सात्त्विकता टिकवून ठेवण्यासाठी ‘ओम् प्रमाणपत्र’ (OM Certificate) ही संकल्पना मांडण्यात आली. त्यासाठी हिंदुत्ववादी संघटना नाशिकमध्ये संघटित झाल्या आणि शुक्रवारी, १४ जून रोजी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील काही मिठाई विक्रेत्यांना ओम् प्रमाणपत्र वितरीत करून या चळवळीला सुरुवात झाली.

(हेही वाचा ‘ओम् प्रमाणपत्र’ केवळ प्रसाद आणि पूजा साहित्यापुरते मर्यादित नसणार; हिंदूंना सर्वच गोष्टी पवित्र मिळाल्या पाहिजेत; Ranjit Savarkar यांची घोषणा)

पेढ्यांमध्ये गाईच्या चरबीचा वापर

रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्यानंतर रणजित सावरकर यांनी माध्यमांशी बोलताना प्रसादात गायीच्या चरबीची भेसळ होत असल्याचे सांगितले होते. अमरावतीला गाईची चरबी आणि खवा वापरून पेढे तयार केले आणि त्याची १००-१०० ग्रॅमची पाकिटे बनवून मंदिरात जात होते, असे रणजित सावरकर यांनी यावेळी सांगितले होते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.