Hadapsar Assembly Constituency : शरद पवार-उद्धव ठाकरे गटात द्वंद्व

207
Assembly Election 2024 : मातोश्री पुढे आता सिल्वर ओकचे वजन वाढत आहे
  • खास प्रतिनिधी 

पुण्याच्या आठ विधानसभा जागांपैकी हडपसर या जागेवरून महाविकास आघाडीत विशेषतः शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात द्वंद्व सुरू झाल्याचे चित्र आहे. दोन्ही गटांनी या जागेवर दावा केला असल्याने बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Hadapsar Assembly Constituency)

हडपसर या विधानसभा मतदारसंघात सद्यस्थितीत स्थानिक किंवा माजी आमदार नाही तर नवख्या उमेदवारांमध्ये चुरस लागली आहे. ‘मनसे’तून शिवसेना उबाठामध्ये प्रवेश केलेले वसंत मोरे हे या जागेसाठी इच्छूक असून राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे गेले वर्षभर देव पाण्यात ठेऊन बसले आहेत. (Hadapsar Assembly Constituency)

(हेही वाचा – Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनल हॅक!)

ताकद नसताना दावा

हडपसरचे विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांनी अजित पवार यांना साथ दिली. त्यामुळे जगताप यांना या मतदारसंघात उभे राहण्याची आयती संधी निर्माण झाली. मात्र वसंत मोरे यांनी ‘मनसे’तून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून पुण्यातून लोकसभा निवडणूक तिकीट मिळवले. निवडणूक लढवली मात्र भाजपाचे पैलवान मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर पडले. त्यानंतर मोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला आणि ताकद नसताना मोरे यांच्यावर विश्वास ठेवून हडपसर मतदारसंघावर दावा केला. (Hadapsar Assembly Constituency)

(हेही वाचा – Congress ने गणपतीला तुरुंगात टाकलं तेव्हा तुम्ही गप्प का? PM Narendra Modi यांचा ठाकरेंना सवाल)

बंडखोरीची शक्यता

काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत आणि नेत्या सुषमा अंधारे यांनी हडपसर मतदारसंघात उबाठाचा उमेदवार उभा राहणार असल्याचे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले. यामुळे राष्ट्रवादी (शप) गोटात प्रचंड चीड व्यक्त होत असून जगताप यांनीही शरद पवार यांच्याकडे या जागेचा आग्रह धरला असल्याने महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Hadapsar Assembly Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.