- प्रतिनिधी
बेस्ट बसमध्ये गर्दीच्या वेळी प्रवाशाचे मोबाईल फोन आणि पाकीट चोरीच्या घटना नियमित आहे. परंतु, गुरुवारी रात्री चक्क बेस्ट बस वाहकाला लुटण्याचा प्रकार धारावी पिवळा बंगला येथे घडला. लुटाऱ्याने बस वाहकाजवळ असलेली प्रवासी भाड्याची रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला असता बस वाहकाने त्याला विरोध करताच लुटारूने वाहकावर चाकूने हल्ला करून वाहकाचा मोबाईल फोन चोरी करून पळ काढला होता. या हल्ल्यात बस वाहक गंभीररीत्या जखमी झाला असून त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Crime)
(हेही वाचा – Amravati News : अमरावतीत १९ दिवसांत ४१ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण)
या घटनेच्या १२ तासांतच धारावी पोलिसांनी या हल्लेखोर लुटारूच्या धारावीतून मुसक्या आवळून त्याला हत्यारासह अटक करण्यात आली आहे. अशोक डगळे (४४) असे हल्ल्यात जखमी झालेले बेस्ट बस वाहकाचा नाव आहे. अशोक डगळे हे गुरुवारी विक्रोळी आगाराच्या बेस्ट रूट क्रमांक ७ या बसमध्ये वाहक म्हणून कर्तव्याला होते. गुरुवारी ही बस पायधुनी येथून विक्रोळी आगाराकडे निघाली होती. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही बस धारावी पिवळा बंगला येथे आली असता एक २२ ते २५ वयोगटातील तरुण बस मध्ये चढला आणि त्याने अशोक डगळे यांच्या खांद्यावर असलेली प्रवासी भाड्याची रक्कम असलेली बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. (Crime)
(हेही वाचा – गणेशोत्सवात PMP ला १७ कोटी ४३ लाखांचे उत्पन्न)
परंतु डगळे यांनी त्याला विरोध करताच या तरुणाने खिशातून धारदार चाकू काढून अशोक डगळे यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बस मधील प्रवाशामध्ये गोंधळ उडाला, या गोंधळात हल्लेखोर हा बस वाहक अशोक डगळे यांचा मोबाईल फोन घेऊन पसार झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अशोक डगळे यांना तात्काळ सायन रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. धारावी पोलिसांनी अशोक डगळे यांचा जबाब नोंदवून जबरी चोरीसह हत्याराने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. लुटारूच्या शोधासाठी धारावी पोलीस ठाण्याचे गुंडा विरोधी पथकाला तात्काळ हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. धारावी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि खबऱ्याच्या मदतीने हल्लेखोर याची ओळख पटवून धारावी परिसरातून शादाब खान याला हत्यारासह अटक करण्यात आली आहे. शादाब खान हा नशेबाज असून त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community