पुण्यातील समाधान चौकात (Saadhan Chowk) अचानक रस्ता खचल्याने संपूर्ण ट्रकच नाल्यात गेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. पुण्यातील सीटी पोस्टजवळ (CT post) अचानक रस्ता खचला आणि संपूर्ण ट्रकच खड्ड्यात गेला. ज्याची दृश्य ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. (PMC Truck)
![सिटी पोस्ट ऑफिस कंपाऊंडमध्ये PMC Truck पडला खड्ड्यात; व्हिडिओ झाला व्हायरल 1 सिटी पोस्ट ऑफिस कंपाऊंडमध्ये PMC Truck पडला खड्ड्यात; व्हिडिओ झाला व्हायरल](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2024/09/New-Project-83-1-1024x555.webp)
जिथे हा खड्डा पडला त्याच्या खाली मोठा नाला असल्याने ट्रक हा नाल्यातच गेला. मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेचा (Pune Municipal Corporation) हा ट्रक असून काही मटेरिअल घेऊन तो समाधान चौकात आला होता. जिथे दुरुस्तीचं काम सुरू होतं. हा ट्रक जेव्हा तिथे आला त्यावेळी तेथील पेव्हर ब्लॉक हे खचले आणि अख्खा ट्रक खाली गेला. (PMC Truck)
(हेही वाचा – Edible Oil Prices : गृहिणींचे बजेट बिघडणार, खाद्यतेलाच्या भावात वाढ)
शहराच्या मध्यवर्ती भागातील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात मैलापाणी वाहिनी दुरूस्तीसाठी गेलेला ट्रक अचानक २५ फूट खड्डा पडून त्यात गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
.#PMC pic.twitter.com/6dWb7zgbgO— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) September 20, 2024
या ट्रकमधील चालक आणि इतर लोक सुस्थितीत आहेत की नाही हे याची अग्निशमन दलाकडून (fire brigade) तपासणी करण्यात येत आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याचीही माहिती घेतली जात आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community