मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा पारा चढलेला असून बुधवारी जिथे ८६३ रुग्ण आढळून आले होते, तिथे गुरुवारी दिवसभरात ७८९ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
#CoronavirusUpdates
२४ जून, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ७८९
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ५४२
बरे झालेले एकूण रुग्ण – ६९१६७०
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%एकूण सक्रिय रुग्ण- १४८१०
दुप्पटीचा दर- ७२६ दिवस
कोविड वाढीचा दर ( १७ जून ते २३ जून)- ०.०९ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 24, 2021
दिवसभरात १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली!
बुधवारी जिथे ३७ हजार ९०५ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर रुग्णांची संख्या ८६३ एवढी होती, तर गुरुवारी ३५ हजार ७६४ चाचण्या करण्यात आल्यानंतर ७८९ रुग्ण आढळून आले. त्यामुळे बुधवारच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्ण संख्या कमी दिसून येत असली तरी चाचण्यांच्या संख्येनुसार रुग्ण संख्या वाढलेलीच आहे. तर दिवसभरात ५४२ रुग्ण बरे होवून घरी परतले. गुरुवारपर्यंत १४ हजार ८१० रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. तर दिवसभरात १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. यामध्ये ०५ मृत रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. मृतांमध्ये ०३ पुरुष आणि ०७ महिला रुग्णांचा समावेश होता. या मृत रुग्णांपैकी १ रुग्ण हा ४० वर्षांखालील वयोगटातील होता, तर ०६ रुग्ण हे ६० वर्षांवरील होते आणि उर्वरीत ०३ मृत रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.
(हेही वाचा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता! ‘या’ ७ जिल्ह्यांना धोका? )
मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ७२६ दिवसांवर आला!
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ७२६ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ८७ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या ११ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community