Chess Olympiad 2024 : बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पुरुष व महिला संघाची सुवर्णाच्या दिशेनं वाटचाल 

Chess Olympiad 2024 : खुल्या गटात भारतीय पुरुषांनी चीनचा तर महिलांनी जॉर्जियाचा पराभव केला 

41
Chess Olympiad 2024 : बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये पुरुष व महिला संघाची सुवर्णाच्या दिशेनं वाटचाल 
Chess Olympiad 2024 : बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये पुरुष व महिला संघाची सुवर्णाच्या दिशेनं वाटचाल 
  • ऋजुता लुकतुके 

यंदाच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या दोन्ही संघांनी आपली विजयी मालिका आठव्या फेरीअखेरीस कायम ठेवली आहे. शिवाय दोन्ही संघांकडे एकापेक्षा जास्त गुणांची आघाडी आहे. त्यामुळे यंदाही पदक निश्चित मानलं जात आहे. तर डी गुकेश (Gukesh Dommaraju) आणि अर्जुन एरिगैसी (Arjun Erigaisi) या पुरुष खेळाडूंच्या अपराजीत राहण्याचं विशेष कौतुक होतंय. खुल्या गटात सहाव्या फेरीत पुरुष संघाचा मुकाबला चीनशी होता. चीनचा जगज्जेता डिंग लिरेन (Ding Liren) हा सामना जाणीवपूर्वक खेळला नाही. (Chess Olympiad 2024)

चीन विरुद्धच्या सामन्यात भारताकडून पहिल्या सामन्यात अर्जुन एरिगैसी (Arjun Erigaisi) खेळला. जागतिक क्रमवारीत सध्या चौथ्या स्थानावर असलेला अर्जुन चिनी बारदिया ज्जानेश्वर विरुद्ध सुरुवातीपासून भारी पडला. काळ्या मोहऱ्यांनिशी त्याने विजय साध्य केला. पाठोपाठ जग्गजेत्या डिंग लिरेनला आव्हान देणारा डी गुकेशही फॉर्मात होता. त्यानेही दुसरा सामना जिंकून २-० अशी आघाडी संघाला मिळवून दिली. लिरेन गुकेशला टाळण्यासाठी या लढतीत खेळला नाही. (Chess Olympiad 2024)

(हेही वाचा- Cidco: हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं आता शक्य होणार! सिडकोने दिली आनंदाची बातमी)

तिसऱ्या सामन्यात प्रग्यानंदाने बरोबरी साधली असली तरी चौथा सामना विदिथ गुजरातीने जिंकला. भारताने चीनविरुद्ध ३.५ विरुद्ध ०.५ गुणांनी विजय मिळवला. (Chess Olympiad 2024)

 तर महिला गटातही भारतीय महिलांनी आगेकूच कायम ठेवली आहे. त्यांनी जॉर्जियाचा ३ – १ ने पराभव केला. भारतासाठी आर वैशाली आणि वंतिका अगरवालने विजयाचे २ गुण वसूल केले. तर हरिका द्रोणवल्ली आणि दिव्या देशमुख यांनी आपापले सामने बरोबरीत सोडवले. (Chess Olympiad 2024)

(हेही वाचा- Sharad Pawar यांची सुप्रीम कोर्टात धाव! निवडणुकांपूर्वी केली ‘ही’ मोठी विनंती)

२२ सप्टेंबरपर्यंत बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा चालणार असून स्पर्धेच्या दोन फेऱ्या अजून बाकी आहेत. सर्वाधिक गुण मिळवणारा संध यात विजयी होईल. १९२४ पासून फिडे ही जागतिक बुद्धिबळ संघटना सांघिक बुद्धिबळाची ही स्पर्धा भरवत आहे. भारताने आतापर्यंत स्पर्धेत एकदा कांस्य पदक पटकावलं आहे. (Chess Olympiad 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.