Hardik Pandya : हार्दिक पांड्या रणजी खेळण्यासाठी उत्सुक 

150
Hardik Pandya : हार्दिक पांड्या टी-२० अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय क्रिकेट जगताला नोव्हेंबर महिन्यातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेध लागले आहेत. त्यापूर्वी पाच कसोटी सामने असले तरी हा दौरा एक मोठं आव्हान आहे. या आव्हानाची तयारी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही (Hardik Pandya) करताना दिसतोय. टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये हार्दिक हा भारताच्या मधल्या फळीतील नियमित खेळाडू आहे. पण, आता तो कसोटी संघात पुनरागमनाचे प्रयत्न करताना दिसत आहे. कारण, बडोद्यात तो लाल चेंडूवर फलंदाजी आणि गोलंदाजीचा जोरदार सराव करताना दिसत आहे.

(हेही वाचा- Dharavi: धारावीत तणाव! मशीदचा अवैध भाग तोडण्यासाठी गेलेल्या बीएमसीच्या वाहनांवर हल्ला, अल्पसंख्याकांनी आधीच आखली होती हल्ल्याची योजना )

३० वर्षीय हार्दिक २०१८ मध्ये इंग्लंड विरुद्ध शेवटची आंतरराष्ट्रीय कसोटी खेळला आहे. भारतासाठी ११ कसोटींमध्ये त्याने ५३२ धावा आणि ११ बळी मिळवले आहेत. पण, त्यानंतर तो कसोटी संघातून सातत्याचा अभाव आणि दुखापती यामुळे गायब झाला. आता मात्र सय्यद मुश्ताक अली करंडकात तो खेळणार आहे. त्यानंतर रणजी करंडकाची तयारीही करताना दिसतोय. त्याने आपला सरावाचा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. (Hardik Pandya)

कसोटी क्रिकेटमध्ये हार्दिकच्या नावावर एक शतकही जमा आहे. १०८ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर गोलंदाजीतही त्याने एकदा निम्मा संघ गारद करण्याची कामगिरी केली आहे. तर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये हार्दिक आतापर्यंत २९ सामने खेळला आहे. यात त्याने ३३ धावांच्या सरासरीने १,३५१ धावा केल्या आहेत. तर ४८ बळी त्याच्या नावावर आहेत. त्याने प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमध्ये तो लाल चेंडूवर सराव करत आहे, जो हल्ली कसोटी क्रिकेटसाठीच वापरला जातो. त्यामुळे त्याची तयारी आगामी कसोटी हंगामासाठी सुरू आहे, हे उघड आहे. (Hardik Pandya)

(हेही वाचा- Dharavi: धारावीतील ९० फूट रस्त्यावरील मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली चार ते पाच दिवसांची मुदत!)

टी-२० विश्वचषकानंतर हा्र्दिक भारताकडून श्रीलंका दौऱ्यात शेवटचं खेळला होता. त्यानंतर जूनपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. (Hardik Pandya)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.