Sumit Nagal : सुमित नागलने डेव्हिस चषकात खेळण्यासाठी ५० लाख रुपये मागितले?

Sumit Nagal : डेव्हिस चषक स्पर्धेत सुमित आणि युकी भांबरी न खेळल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे 

146
Sumit Nagal : सुमित नागलने डेव्हिस चषकात खेळण्यासाठी ५० लाख रुपये मागितले?
Sumit Nagal : सुमित नागलने डेव्हिस चषकात खेळण्यासाठी ५० लाख रुपये मागितले?
  • ऋजुता लुकतुके 

डेव्हिस चषक सामन्यात अलीकडेच भारताचा स्वीडनने ४-० असा पराभव केला. यात पराभवापेक्षा सुमित नागल (Sumit Nagal) आणि युकी भांबरी यांच्यासारखे ज्येष्ठ खेळाडू न खेळल्याची जास्त चर्चा झाली. खेळाडूंनी राष्ट्रीय संघासाठी उपलब्ध झालं पाहिजे अशी टेनिस असोसिएशनची इच्छा होती. पण, सुमित आणि युकी यांनी दुखापतीचं कारण पुढे केलं खरं. पण, त्याच कालावधीत सुमित चीनमध्ये एटीपी चॅलेंजर खेळताना दिसला. यावर भारतीय टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल धुपार (anil dhupar) यांनी उघड टीका केली होती.

त्यानंतर धुपार यांनीच आता नवीन आरोप केला आहे. सुमित नागलने (Sumit Nagal) देशासाठी खेळण्यासाठी ५० लाख रुपये संघटनेकडे मागितले, असा त्यांचा दावा आहे. ‘मला सांगा राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी सुमितने पैसे का मागावेत? त्याने अख्खा डेव्हिस हंगाम खेळण्यासाठी ५० लाख रुपये मागितले. त्याने पैसे का मागितले, हा प्रश्नच आहे,’ असं धुपार पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

(हेही वाचा- Dharavi: धारावीत तणाव! मशीदचा अवैध भाग तोडण्यासाठी गेलेल्या बीएमसीच्या वाहनांवर हल्ला, अल्पसंख्याकांनी आधीच आखली होती हल्ल्याची योजना )

खेळाडूंच्या या भूमिकेविषयी आता देशवासीयांनाच निर्णय घेऊदे, असंही धुपार यावेळी म्हणाले. तर सुमित नागलने (Sumit Nagal) त्याची भूमिका स्पष्ट करताना हा आपला मेहनताना असल्याचं म्हटलं आहे. ‘व्यावसायिक टेनिसमध्ये तशी पद्धतच आहे. खेळाडू राष्ट्रीय संघात खेळताना बाकीच्या स्पर्धा चुकवतो. तिथे अपेक्षित असलेले पैसे खेळाडूला मिळावेत, एवढाच विचार त्या मागे आहे. मी जास्त पैसे मागितलेले नाहीत. जगभरात हीच पद्धत अवलंबली जाते,’ असं सुमितने अधिकृत पत्रक काढून म्हटलं आहे.

डेव्हिस चषक स्पर्धा खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेकडून भारतीय संघटनेला ठरावीक पैसे मिळतात. एक जागतिक फेरी खेळण्यासाठी संघटनेला ३० लाख रुपये मिळतात. यातील ७० टक्के पैसे खेळाडूंमध्ये वाटून उर्वरित पैसे संघटना प्रशासकीय कामांसाठी आपल्याकडे ठेवते. पण, हे पैसे अपुरे असल्याचं खेळाडूंचं म्हणणं आहे. यापूर्वीही अगदी लिअँडर पेस आणि महेश भूपतीच्या काळातही खेळाडूंनी डेव्हिस चषकात मिळणाऱ्या मोबदल्याविषयी आवाज उठवला आहे. त्यामुळे हा प्रश्न भारतीय टेनिसमधला खूप वर्ष चालत आलेला प्रश्न बनला आहे. (Sumit Nagal)

(हेही वाचा- Dharavi: धारावीतील ९० फूट रस्त्यावरील मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली चार ते पाच दिवसांची मुदत!)

स्वीडन विरुद्धच्या सामन्यात भारताचे आघाडीचे एकेरी खेळाडू खेळले नाहीत. त्यामुळे एल बालाजी आणि रामकुमार रामनाथन या दुहेरी जोडीलाच एकेरी सामनेही खेळावे लागले. महत्त्वाचं म्हणजे चार सामन्यात एकही सेट न जिंकता भारताचा स्वीडन विरुद्ध पराभव झाला. (Sumit Nagal)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.